वट पौर्णिमेच्या व्रताला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वट पौर्णिमेचा व्रत किंवा वट सावित्री व्रत विवाहित महिला करतात. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि वटवृक्षाची पूजा केल्याने पतीचे आयुष्य दीर्घायुषी राहते, तसेच वैवाहिक जीवन आनंदी राहते, असा समज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात. धर्मग्रंथानुसार वटवृक्षाच्या खोडात भगवान विष्णू, मुळांमध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये भगवान शिव वास करतात. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसोबत वटवृक्षाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि अखंड भाग्य मिळते, असे मानले जाते. याशिवाय वडाच्या झाडाची पूजा करणे देखील संतती प्राप्तीसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व दिले जाते.

Vat Purnima 2022: उद्या आहे अखंड सौभाग्यासाठी ठेवला जाणारा ‘वटपौर्णिमेचा व्रत’; जाणून घ्या पुजेचा मुहूर्त आणि योग्य विधी 

वटवृक्षात ब्रह्मा-विष्णू-महेश यांच्या निवासाशिवाय आणखी एक महत्त्वाची घटना या वृक्षाशी निगडीत आहे. धार्मिक पौराणिक कथेनुसार, वडाच्या झाडाखाली देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन दिले. देवी सावित्रीला तिचा नवरा पुन्हा मिळाला होता, म्हणून स्त्रिया हे व्रत पाळतात आणि वटवृक्षाची पूजा करतात.

याशिवाय जैन तीर्थंकर ऋषभदेव यांनीही अक्षय वटखाली तपश्चर्या केल्याचे मानले जाते. प्रयागमधील हे ठिकाण भगवान ऋषभदेवांची तपस्थळी म्हणून ओळखले जाते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)