Vat Purnima 2023: वटपौर्णिमा हा नवरा-बायकोच्या पवित्र नात्याचा खूप मोठा सण आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पती किंवा नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. याच पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने वटवृक्षाच्या खाली सत्यवानाचे प्राण परत आणले होते. या दिवसाची आठवण म्हणून विवाहित महिला पतीला भरपूर आयुष्य लाभावे, यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे? आज आपण वटपौर्णिमेचे महत्त्व आणि शुभ मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत.

या वर्षी वटपौर्णिमा केव्हा आहे?

देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी आणि मुहूर्तावर वटपौर्णिमा साजरी केली जाते. काही ठिकाणी वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या अमावास्येला साजरी केली जाते तर काही ठिकाणी पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये या वर्षी वट पौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे.

Libra Horoscope Today
Libra Horoscope Today : आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा अन् खर्चावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तूळ राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
27 January 2025 Horoscope In Marathi
२७ जानेवारी पंचांग: मासिक शिवरात्रीने होणार आठड्याची सुरुवात;…
Six Planets yuti created Auspicious Sanyog at a time
एक दोन नव्हे तर सहा ग्रह एकत्र येणार अन् पाच राशींचे धनी होणार! गडगंज श्रीमंती व सुखाने न्हाऊन निघाल
Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
jupiter and venus conjuction 2025
Gajalakshmi Rajyog: येत्या काही दिवसात ‘या’ तीन राशीचे लोक कमावणार बक्कळ पैसा अन् भौतिक सुख; ‘गजलक्ष्मी राजयोग’ घेऊन येणार आनंदी आनंद
Acharya Chanakya's Chanakya Niti
Chanakya Niti: आयुष्यात प्रचंड पैसा अन् धन संपत्ती कमवायची असेल तर चाणक्य नीतिने सांगितलेल्या ‘या’ तीन सवयी अंगीकारा, मिळेल अपार श्रीमंती
Shatgrahi Yog 2025 six planets auspicious yog in pisces
Shatgrahi Yog 2025 : २९ मार्चनंतर ‘या’ राशींचे खुलणार नशीब, मीन राशीतील शतग्रही योगाने मिळणार अमाप पैसा अन् कामात यश
26 January 2025 Rashi Bhavishya In Marathi २६ जानेवारी राशिभविष्य आणि पंचांग
26 January Horoscope: ज्येष्ठा नक्षत्रात काही राशींना अचानक होईल धनलाभ! कोणाच्या नशिबात नवीन संधी तर कोणाला मिळेल गुंतवणुकीत लाभ, वाचा रविवारचे राशिभविष्य

(हे ही वाचा: Chandra Grahan 2023 : वर्षातील दुसरं चंद्रग्रहण केव्हा आहे माहित्येय का? जाणून घ्या वेळ आणि भारतात ते दिसणार का?)

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त

वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा सकाळी ११ वाजता सुरू होणार तर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून दहा मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे. या शुभ मुहूर्तादरम्यान तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता.

वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व

वटपौर्णिमा व्रत हे विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात. अविवाहित मुलीसुद्धा चांगला पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेचे व्रत करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी नांदते. पतीचं आयुष्य वाढतं. पती संकटातून मुक्त होतो. एवढंच काय तर संतानप्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात.

Story img Loader