21st June Panchang & Rashi Bhavishya: २१ जून २०२४ ला ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांनी चतुर्दशी तिथी समाप्त होईल व त्यानंतर पौर्णिमा तिथीचा प्रारंभ होईल. आज मराठी पंचांगानुसार वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. २१ जून ला संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत शुभ योग असणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. आजचा दिनविशेष पाहिल्यास आज आंतरराष्ट्रीय योग दिवस सुद्धा असणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आज मेष ते मीन राशीच्या भाग्यात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..
२१ जून पंचांग व राशी भविष्य
मेष:-हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ:-नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल.
मिथुन:-दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.
कर्क:-कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अति हट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी.
सिंह:-नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या:-आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात.
तूळ:-दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील. तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल.
वृश्चिक:-मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनू:-संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या.
मकर:-कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी.
कुंभ:-समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल.
हे ही वाचा<< शनी कृपेने उलट फिरणार नशिबाचे तारे; २०२५ पर्यंत या तीन राशींचे अच्छे दिन, ‘या’ रूपात घरी येईल लक्ष्मी
मीन:-निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
© IE Online Media Services (P) Ltd