वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या भविष्याबाबत अंदाज लावण्याचे विविध मार्ग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचे अक्षर, मूळ अंक, जन्मतारीख यांवरून, तसेच कुंडलीवरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचे अंदाज वर्तवले जाऊ शकतात. अशीच ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे टॅरो कार्ड्स. टॅरो कार्ड्स ही ज्योतिषशास्त्राची भविष्यवाणी करण्याची एक अद्भुत व प्राचीन पद्धत आहे; ज्याद्वारे भविष्यातील घटनांशी संबंधित समस्या पाहण्याचा, गणना करण्याचा व सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि टॅरो कार्ड वाचन या दोन्ही अंदाज पद्धती आहेत; ज्या लोकांना भविष्य समजून घेण्यास मदत करतात.
वैदिक ज्योतिष हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे; ज्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रह, तारे इत्यादींचा अभ्यास केला जातो. हा एक विशाल विषय आहे आणि सुमारे पाच हजार वर्षांपासून आहे. दुसरीकडे टॅरो कार्ड पंधराव्या शतकापासून युरोपमध्ये लोकप्रिय आहेत; परंतु त्यांचे मूळ इजिप्शियन सभ्यतेपूर्वी दहाव्या-बाराव्या शतकाच्या आसपास कधीतरी होते. त्यामुळे ज्योतिषाची मुळे फक्त भारतातच नाहीत.
वैदिक ज्योतिषशास्त्र म्हणजे काय?
वैदिक ज्योतिषशास्त्र पाच हजार वर्षे जुने शास्त्र आहे; जे जन्माच्या वेळच्या आकाशातील ग्रह आणि ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करते. हे प्राचीन वैदिक शास्त्रांवर आधारित आहे; जे ऋषींनी लिहिले होते, असे मानले जाते. तारे, ग्रह आणि सर्व वैश्विक अस्तित्वांबद्दलची अफाट माहिती वैदिक शास्त्रांमध्ये नमूद केलेली आहे; ज्याद्वारे ज्योतिषांनी एखाद्याच्या जीवनातल्या भविष्यातील घटनांची गणना करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली निर्धारित केली.
वैदिक ज्योतिषशास्त्र तुमच्या सूर्य, चिन्हे व ताऱ्यांच्या अनुक्रमांवर आधारित तुमच्या जीवनाच्या वाटचालीबद्दल भाकीत करते आणि कुंडली म्हणून ओळखले जाणारा जन्म तक्ताही तयार करते; जे तुम्हाला ग्रहांची स्थिती आणि ते तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतील हे सांगते.
(हे ही वाचा : पुढील वर्ष सुरु होताच ‘या’ ३ राशी होणार धनवान? लक्ष्मी-सूर्यदेव वर्षभर देऊ शकतात प्रचंड पैसा कमवण्याची संधी )
वैदिक ज्योतिषशास्त्र कसे कार्य करते?
वैदिक ज्योतिष हे एक असे शास्त्र आहे; जे ग्रह आणि तारे यांसारख्या खगोलीय पिंडांच्या हालचाली आणि मानवी जीवनावर त्यांचा प्रभाव यांचा अभ्यास करते. त्याला महर्षी वैदिक ज्योतिष किंवा हिंदू ज्योतिष म्हणूनही ओळखले जाते. प्राचीन कालखंडात ज्योतिषांनी विशिष्ट नमुन्यांची निरीक्षणे केली होती आणि त्यांच्या लक्षात आले की, विशिष्ट कालावधीनंतर नमुन्यांची पुनरावृत्ती होते; ज्यामुळे त्यांना ग्रहांच्या भविष्यातील वाटचालीचा अंदाज लावण्यासाठी एक गणितीय प्रणाली प्राप्त झाली.
वैदिक ज्योतिषी तुमच्या कुंडलीचे विश्लेषण करण्यासाठी, तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यानुसार निर्णय घेण्यासाठी सूचना देण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात. वैदिक ज्योतिषशास्त्र हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व, नातेसंबंध सुसंगतता आणि आरोग्यविषयक चिंता किंवा आर्थिक स्थिती यांसारख्या सामान्य कल्याणाशी संबंधित इतर गोष्टी निर्धारित करण्यासाठी ते नक्षत्र (तारे) आणि गणितीय गणना वापरतात.
टॅरो कार्ड वाचन कसे कार्य करते?
टॅरो कार्ड सामान्य खेळण्याच्या पत्त्यांसारखे दिसतात; पण त्यांचे विश्व खूप गूढ आहे. अलीकडे टॅरो कार्ड वाचन खूप प्रचलित झाले आहे. टॅरो कार्ड वाचण्यापूर्वी तुम्हाला मेजर अर्काना कार्ड्स आणि मायनर अर्काना कार्ड्सचे चांगले ज्ञान असले पाहिजे. मेजर अर्कानामध्ये २२ कार्डे असतात; तर मायनर आर्कानामध्ये ५६ कार्डे असतात.
मेजर अर्काना कार्ड्सच्या मागे अनेक गोष्टी आहेत; ज्या वेगवेगळ्या चिन्हांमध्ये प्रतीकात्मक आणि गुप्तपणे रेकॉर्ड केल्या गेल्या आहेत. ही प्रतिकात्मक चिन्हे पाहून टॅरो कार्ड रीडर व्यक्तीच्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज लावतो. टॅरो कार्डवर केलेली चिन्हे लोकांच्या प्रश्नांची उत्तरे स्वतः देतात. टॅरो कार्ड उचलणाऱ्या व्यक्तीनुसार त्याचे भविष्य सांगितले जाते. टॅरो कार्डवाचन हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनासंदर्भात सखोल माहिती मिळविण्याचे प्रभावी माध्यम आहे. टॅरो रीडिंग हा आजच्या जगात भविष्य सांगण्याचा एक प्रचलित प्रकार आहे. तुम्ही ते प्रेम, करिअर व पैसा यांसह अनेक कारणांसाठी वापरू शकता.
(हे ही वाचा : २०२४ मध्ये जगावर सात मोठी संकटं घोंगावतायत? बाबा वेंगा यांची येत्या वर्षाची भविष्यवाणी वाचून उडेल थरकाप )
टॅरो कार्ड विश्वसनीय का नाहीत?
टॅरो कार्ड रीडर टॅरो कार्ड्समध्ये तज्ज्ञ नाहीत. ते ज्योतिष तज्ज्ञही नाहीत. अंकशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्रालाही हेच लागू होते. वाचक हा फक्त एक जनर्लिस्ट आहे; जो त्यांच्या कौशल्यांचा सराव करत आहे आणि तरीही या विषयांवर काही सखोल ज्ञान नाही. म्हणूनच ही व्यक्ती तुमच्या भावी आयुष्य किंवा वर्तमानाबद्दल काय भाकीत करेल, हे समजणे कठीण आहे.
वैदिक ज्योतिष हे ताऱ्यांचे विज्ञान आहे आणि ते मानवी स्वभाव, वर्तन व व्यक्तिमत्त्व समजून घेण्यास मदत करते. त्याच वेळी टॅरो कार्ड वाचन जीवनातल्या भविष्यातील घटना समजून घेण्यास मदत करते. टॅरो कार्ड वाचन ही शक्यता व निर्णयाची पद्धत आहे; तर वैदिक आणि पाश्चात्त्य ज्योतिष ही गणितीय गणना पद्धत आहे. ज्योतिषशास्त्रातील ग्रहांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू ठरवते. भारतात अनेक ज्योतिषी या पद्धतीचा अवलंब करतात.
भारतीय वंशाच्या महान ऋषी-मुनींनी विश्वाच्या अचूक नमुन्यांचा अंदाज लावण्यासाठी विविध भविष्यवाणी पद्धती वापरून पाहिल्या आहेत. त्यांना अपेक्षित परिणाम देणारी प्रणाली सेट करण्यापूर्वी त्यांनी दररोज अनेक निरीक्षणे केली. टॅरो कार्ड वाचन हे इटलीमध्ये आले आणि ते दैनंदिन भविष्यवाणीचे विश्वसनीय स्रोत बनले.