Shukra-Rahu Yuti: ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र आणि राहू या दोन्ही ग्रहांना खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दोन्ही ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा किंवा नक्षत्र परिवर्तनाचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. अशातच आता या दोन्ही ग्रहांची युती निर्माण होणार असून याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पडेल. ज्योतिषशास्त्रानुसार २०२५ च्या सुरुवातीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार असून या राशीत आधीपासून राहू ग्रह विराजमान आहे.
पंचांगानुसार, शुक्र २८ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र ग्रहाची राहू ग्रहाबरोबर युती निर्माण होईल.
राहू-शुक्र ग्रहाची युती ठरणार भाग्यशाली
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना राहू आणि शुक्र ग्रहाची युती खूप लाभदायी सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. मीन राशीत विराजमान असलेला राहू ग्रह कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ
राहू आणि शुक्र ग्रहाची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. या काळात अडकलेले पैसे मिळतील. आध्यात्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मानसिक तणाव दूर होईल. अनेक सुख-सुविधा प्राप्त होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंध चांगले होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. वैवाहित जीवन सुखमय राहिल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील.
हेही वाचा: ‘या’ चार राशी कमावणार पैसाच पैसा; राहू-केतूचे राशी परिवर्तन देणार मानसन्मान आणि गडगंज पैसा
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी राहू आणि शुक्र ग्रहाची खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येतील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)