ज्योतिष शास्त्रानुसार मेष ही अग्नी तत्वाची राशी आहे आणि मंगळ ग्रहाच्या मालकीची आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना इतरांच्या आसपास राहणे आवडते आणि त्यांच्यामध्ये उत्साह सुद्धा खूप असतो. यासोबतच लोक सामान्यतः आनंदी आणि सकारात्मक स्वभावाचे असतात. याशिवाय ते रोमँटिक परिस्थितीतही खूप उत्साही असतात.
२३ मे २०२२ रोजी संध्याकाळी ०८.१६ मिनिटांनी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल. या राशी परिवर्तनाचा सर्व १२ राशींवर परिणाम होतो. परंतु शुक्र राशी परिवर्तनाचा काही राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या काळात लोक अधिक पैसे कमवू शकतात, परंतु सर्वसाधारणपणे त्यांचे खर्च देखील वाढण्याची शक्यता असते. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत ज्यावर अशुभ प्रभावाची चिन्हे आहेत-
आणखी वाचा : Shani Vakri 2022: ‘या’ दिवसापासून शनीची वक्री चाल सुरू, या राशींच्या अडचणी वाढू शकतात!
वृषभ: शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत पूर्वीपेक्षा जास्त सावध राहावे लागेल, या काळात वृषभ राशीच्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय डोळ्यांशी संबंधित काही किरकोळ आजार होण्याची चिन्हे आहेत. या काळात व्यक्तीच्या खर्चात वाढ होईल, पैशांची बचत होण्याची शक्यता कमी आहे, अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा. सकारात्मक बाजूंबद्दल बोलायचे झाल्यास, वडिलोपार्जित संपत्ती किंवा वारसाहक्काच्या स्वरूपात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : मेष राशीत शुक्राचा प्रवेश, या राशींच्या व्यक्तींची लव्ह लाईफ असेल अप्रतिम!
कन्या : शुक्र गोचराचा नकारात्मक प्रभाव कन्या राशीच्या लोकांवरही दिसून येईल, या काळात अचानक खर्च वाढू शकतो. वाढत्या खर्चामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय वडिलांवर पैसे खर्च करावे लागतील. या दरम्यान मनात विचित्र विचार येण्याची दाट शक्यता असते, अशा परिस्थितीत कोणताही मोठा निर्णय विचार करूनच घ्या.
आणखी वाचा : शुक्र-मंगळाच्या युतीमुळे मीन राशीत ‘ग्रहयोग’, या राशींवर विशेष प्रभाव पडेल
वृश्चिक: शुक्राचा प्रभाव असलेली तिसरी राशी वृश्चिक आहे, अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या जोडीदाराशी संबंधात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काही जुन्या गोष्टींमुळे तुमचे नाते बिघडू शकते, अशा परिस्थितीत तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि परस्पर समन्वय वाढवण्याचा प्रयत्न करा. या काळात लोकांच्या खर्चात वाढ दिसून येईल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि खर्चाचे योग्य नियोजन करा.