Astrology : २५ जुलैला म्हणजेच उद्या शुक्र आणि बुध ग्रह सिंह राशीमध्ये एकत्र येणार असून, त्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रेम, पैसा व करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा लक्ष्मीनारायण योगाचा शुभ लाभ घ्या. हा काळ वाया जाऊ देऊ नका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाने ७ जुलै रोजी सकाळी ३ वाजून ५९ मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर २३ जुलैला सकाळी ६ वाजून १ मिनिटाने शुक्र वक्री झाला आहे आणि आता ७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी पुन्हा कर्क राशीमध्ये मार्गक्रमण करेल. या राशीमध्ये शुक्र २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत राहील आणि त्यानंतर ४ सप्टेंबर २०२३ रोजी तो मार्गक्रमण करणार आहे. शुक्र गोचर जवळपास २३ दिवसांच्या काळामध्ये होते. शुक्र ग्रहाला वृषभ आणि तूळ राशीचे स्वामित्व मिळाले आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन व कन्या राशीचा स्वामी बुध आहे. २५ जुलै रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे सिंह राशीत बुध व शुक्र यांची युती होईल; ज्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होणार आहे.

सामान्यतः शुक्र हा आपल्या जीवनातील संपत्ती, समृद्धी, आनंद, धनलाभ, आकर्षण, सौंदर्य, तारुण्य, प्रेमसंबंध, प्रेम इच्छा, प्रेमातून मिळणारे समाधान इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे. शुक्राची बुध ग्रहाशी युती होणे अधिक शुभ मानले जाते. या युतीमुळे ‘या’ तीन राशींना जीवनातील प्रत्येक सुख मिळणार आहे.

लक्ष्मीनारायण योगाचे लाभ ७ ऑगस्ट रोजीच्या ७.३९ पर्यंत मिळेल; जेव्हा शुक्र कर्क राशीत परत येणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी या कालावधीतील प्रत्येक मिनिटाचा पुरेपूर लाभ घ्यावा. कारण- अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत.

मिथुन
शुक्र-बुध यांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या लक्ष्मीनारायण योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि मागील कर्जातून त्यांची सुटका होऊ शकते. नोकरदार लोक ७ ऑगस्टपर्यंत लाभदायक कालावधीची अपेक्षा करू शकतात. या कालावधीमध्ये त्यांच्या कठोर परिश्रमांना ओळखून, कामाचे कौतुक केले जाईल; ज्याचा इतरांवर कायमचा परिणाम होईल. व्यावसायिकांनाही या काळात फायदा होईल. विकास आणि यश मिळण्याची शक्यता आहे. या शुभ मुहूर्ताचा मोकळ्या मनाने स्वीकार करा. कारण- त्यात मिथुन राशीच्या लोकांना समृद्धी आणि व्यावसायिक समाधान मिळण्याची क्षमता आहे.

हेही वाचा – गरीब व्यक्तीलाही धनवान करू शकते ‘ही’ चाणक्य नीती? फक्त करू नका ‘या’ चुका

कन्या
शुक्र-बुध यांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या लक्ष्मीनारायण योगामुळे कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन, त्यांचा भाग्योदय होणे निश्चित आहे. मालमत्तेच्या वादात विजयासह लाभदायक प्रकल्प आणि चांगली बातमी मिळू शकते. मागील गुंतवणुकीतूनही आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कन्या राशीच्या लोकांसाठी त्यांच्या कुटुंबाच्या भल्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा उत्तम काळ आहे. मुलांशी संबंधित सकारात्मक बातम्यादेखील आनंद आणि समाधान देऊ शकतात. तसेच शेअर मार्केट आणि लॉटरीमध्येही फायदेशीर परिणाम मिळू शकतात (तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करावी). या शुभ मुहूर्ताचा स्वीकार करा. कारण- त्यात तुम्हाला आनंद आणि संपत्ती मिळण्याची क्षमता आहे.

हेही वाचा – कोणत्याही व्यक्तीसाठी ‘या’ चार ठिकाणी राहणे म्हणजे मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

तूळ
शुक्र-बुध यांच्या युतीमुळे निर्माण होणाऱ्या लक्ष्मीनारायण योगामुळे तूळ राशीच्या लोकांचे नशीब चमकेल. त्यामुळे त्यांना संपत्ती आणि यश मिळेल. तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल; तर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. खर्च आटोक्यात येईल, आर्थिक सुरक्षितता मिळेल. यासोबतच मानसिक शांती व विश्रांतीची अनुभूती मिळेल. उत्साहवर्धक नोकरीच्या संधी निर्माण होऊ शकतात, तसेच आधीच नोकरीत असलेल्या लोकांसाठी प्रगतीच्या संधी मिळतील. तुमची कंपनी वाढवण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus mercury alliance will create lakshminarayan yoga this zodiac sign people will get success in career money and love snk
Show comments