June 2024 Grah Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात सहा ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे, ज्याचा प्रभाव १२ राशींच्या लोकांवर पाहायला मिळेल. १ जून रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रहाचे राशीपरिवर्तन होईल, त्यानंतर यूरेनस ग्रहदेखील वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच १२ जून रोजी शुक्र ग्रह आपली स्वराशी असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करतील. १४ जून रोजी बुध ग्रहाचे मिथुन राशीत राशीपरिवर्तन, जे २९ जून रोजी मिथुनमधून कर्क राशीत प्रवेश करतील.

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहाचा राजा सूर्य १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर शनि देव २९ जून रोजी कुंभ राशीत वक्री होतील. या सहा ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव १२ राशीतील काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Daily zodiac sign horoscope For 17 December 2024
१७ डिसेंबर पंचांग: १२ पैकी ‘या’ राशींचे प्रगतीच्या…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Sun-Saturn conjunction in 2025
२०२५ मध्ये सूर्य-शनीची युती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक क्षेत्रात यश
Triekadash Yogo 2025
२०२५मध्ये शनी-बुध निर्माण करेल त्रिएकादश योग! या राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, होणार धनलाभ
Mars Gochar 2024
पुढील ११० दिवस मंगळ देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार संपत्तीचे सुख अन् प्रत्येक कामात यश

मेष

जून महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे मेष राशीच्या व्यक्तींना त्याचे अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनादेखील जून महिन्यात होणारे राशीपरिवर्तन फायद्याचे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

हेही वाचा: राशीनुसार तुमची ‘इष्ट देवता’ कोण? इष्ट देवतेच्या उपासनेने मिळते यश, पद-प्रतिष्ठा आणि संपत्तीचे सुख

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठीदेखील जूनमधील ग्रहांचे राशीपरिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader