Grah gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. ज्याच्या शुभ किंवा अशुभ प्रभाव विशेष राशींच्या आयुष्यावर पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात.

पंचांगानुसार, शुक्र ग्रहाने १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी शतभिषा नक्षत्रातून पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून या नक्षत्रात शुक्र १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत विराजमान असेल. शुक्राच्या या नक्षत्रातील प्रवेशाने काही राशींना त्याचा शुभ प्रभाव जाणवेल.

Rahu ketu gochar
राहू-केतू देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींचे चमकेल भाग्य अन् मिळेल प्रत्येक कामात यश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saturn will be retrograde for 84 days in 2025
२०२५मध्ये ८४ दिवस शनी होणार वक्री! ‘या’ तीन राशींनी मिळेल अपार पैसा अन् संपत्ती
Saif ali Khan Attacker attack
Saif Ali Khan : एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक बळ वाढेल; कसा जाईल १२ राशींचा बुधवार?

नक्षत्र परिवर्तन करणार मालामाल

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला भौतिक सुख, आकस्मिक धनलाभ होईल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन फायदेशीर ठरेल. या काळात अडकलेले पैसे परत मिळतील. नवी नोकरी मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल, कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मानसिक शांती लाभेल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळवाल. कामाच्या ठिकाणी तुमचेच वर्चस्व असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader