वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते, राशीचं परिवर्तन, उदय होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम हा मानवी जीवनावर होतो. आता ११ जानेवारी रोजी शुक्राचा उदय धनु राशीत झाला आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, भौतिक सुख, समृद्धी, प्रेम आणि संपत्तीचा कारक मानला जातो. जेव्हा शुक्राचा उदय होतो, तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होते आणि त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. पण काही राशीच्या लोकांवर याचा विशेष प्रभाव पडणार आहे. चला जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष (Aries)

मेष हे अग्नि तत्वाचे चिन्ह आहे, ज्याचा स्वामी मंगळ आहे. दुसरीकडे, मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र त्यांच्या दुसऱ्या आणि सातव्या घराचा स्वामी आहे आणि या काळात तुमच्या नवव्या घरात शुक्राचा उदय होत आहे. याचा परिणाम म्हणून तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अनुकूल परिणाम मिळू लागतील. जीवनसाथीच्या मदतीने तुमच्या भाग्यात वाढ होईल. अनेक ठिकाणी फिरण्याचे योग आहेत. करिअरमध्ये यश मिळू शकते.

मिथुन (Gemini)

या राशीचा स्वामी बुध आहे आणि हे वायु तत्वाचे चिन्ह आहे. याशिवाय शुक्र हा बुधचा मित्र ग्रह आहे. तसेच मिथुन राशीच्या सातव्या घरात शुक्राचा उदय होत आहे. अशा स्थितीत शुक्राचा हा प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनावर प्रामुख्याने पडेल. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य सुधारेल आणि त्यांच्याशी तुमचे नाते घट्ट होईल. नात्यात प्रेम आणि आकर्षण वाढेल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा काळ व्यावसायिक करारांसाठी अनुकूल राहील. व्यवसायात एखादी मोठी गोष्ट होऊ शकते, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा : Astrology: ‘या’ ३ राशींच्या लोकांना कधीच सांगू नका तुमचं सिक्रेट!

सिंह (Leo)

शुक्राचा उदय होताच तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. नोकरी बदलण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी शुक्राचा उदय शुभ राहील. सरकारी नोकरी करणाऱ्यांच्या बदलीचे योग आहेत. आर्थिक उद्दिष्टे सहज साध्य करता येतील. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना शुक्राचा उदय लाभदायक ठरेल. व्यवसायात मोठा नफा होईल.

आणखी वाचा : Astrology 2022: राशीनुसार ‘या’ सवयी बदलल्या नाहीतर होईल नुकसान

कुंभ (Aquarius)

सध्या तुमच्या अकराव्या घरात शुक्र ग्रहाचा उदय होत आहे. अशा परिस्थितीत अकराव्या घरात शुक्राची उपस्थिती अनेक बाबतीत तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. सर्व प्रथम, तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. नोकरी केली तर प्रमोशन मिळू शकते आणि व्यवसाय केला तर व्यवसायात आर्थिक प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमची कोणतीही जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या मनात आनंदाची भावना निर्माण होईल.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus planet rise on 11 january 2022 and it is beneficial for these 4 zodiac sign dcp
Show comments