Shukra Transit In Aquarius: ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहांची एकमेकांशी मैत्री असते तर काही ग्रहांमध्ये एकमेकांमध्ये शत्रुत्व असतं. ज्योतिषशास्त्रानुसार २२ जानेवारीला शुक्र ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे आणि २२ फेब्रुवारीपर्यंत तो या राशीत विराजमान राहील. कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि शुक्र यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे कुंभ राशीत असलेले शनिदेव आणि शुक्राची युती ३ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..
तूळ राशी
शुक्राचा राशी बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात प्रवेश करत आहे. त्यामुळे हा काळ विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसंच ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्याची इच्छा याकाळात पूर्ण होऊ शकते. तसंच याकाळात प्रेमप्रकरणातही यश मिळू शकते. तुम्ही फॅमिली मधील सदस्य किंवा लव्ह पार्टनरसोबत कुठेतरी डिनर डेटवर जाऊ शकता. दुसरीकडे, शुक्र ग्रह तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.
वृश्चिक राशी
शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी फलदायी ठरू शकते. कारण शुक्राचे तुमच्या राशीतून सुखस्थानात भ्रमण झाले आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या सर्व सुखसोयी मिळू शकतात. तसेच याकाळात तुम्ही एखादे वाहन खरेदी करू शकता किंवा कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. याशिवाय मालमत्ता किंवा रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करणारे लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. तसंच याकाळात तुमचे आईसोबत असलेले नाते चांगले होईल.
( हे ही वाचा: २० वर्षांनंतर तयार होत आहेत ४ राजयोग; ‘या’ ३ राशी होऊ शकतात प्रचंड श्रीमंत)
वृषभ राशी
वृषभ राशीसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या कर्मस्थानावर शुक्र ग्रहाचे भ्रमण झाले आहे. म्हणूनच या काळात तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्तिथी चांगली राहील. तसंच याकाळात नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांची साथ मिळेल.