Venus Planet Transit In Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेच्या अंतराने राशी बदलतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. यासोबतच ग्रहाचा राशी बदल काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो. वैभव आणि ऐश्वर्य देणारा शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांच्यासाठी हे संक्रमण शुभ सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुंभ राशी

शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगले सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीतील वरच्या घरामध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसेल. यासोबतच जोडीदारासोबतचे नाते याकाळात चांगले होईल . त्याचबरोबर पार्टनरशीपच्या बाबतीतही चांगला फायदा होईल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव मिळू शकतो. त्याच वेळी, या काळात व्यापाऱ्यांना नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.

तूळ राशी

तूळ राशीच्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अनुकूल ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात भ्रमण करेल. जे उच्च शिक्षण आणि प्रेमसंबंध समजले जाते. म्हणूनच यावेळी ज्यांना लव्ह मॅरेज करायचे आहे, त्यांचे लग्न होण्याची शक्यता दिसत आहे. तसेच तूळ राशीचे विद्यार्थी कोणत्याही उच्च शिक्षणात प्रवेश घेऊ शकतात. दुसरीकडे, ज्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.

( हे ही वाचा: येत्या १५ दिवसांत दोन वेळा शनिदेवाचा सर्वात मोठा बदल! ‘या’ राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’? मिळू शकतो प्रचंड पैसा)

वृश्चिक राशी

शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगले सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. जे भौतिक सुख आणि मातेचे स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळू शकतात. तसेच, या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट आणि जमीन-संपत्तीशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus planet transit in shanis rashi kumbh these zodiac sign can get huge amount of money gps