Venus Transit in Leo 2022: सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे. सूर्य सध्या स्वराशी सिंहमध्ये विराजमान आहे. शुक्र देखील ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सिंह राशीमध्ये सूर्य आणि शुक्राचा संयोग होईल. शुक्र २३ दिवस सिंह राशीत विराजमान राहील आणि सूर्य १५ सप्टेंबरपर्यंत राहील. अशाप्रकारे, ३१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत सूर्य आणि शुक्राचा संयोग सर्व १२ राशींवर परिणाम करेल. यापैकी ५ राशींवर त्याचा प्रभाव नकारात्मक असेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी सूर्य-शुक्र संयोगामुळे अडचणी वाढतील.

सूर्य शुक्राची युती ‘या’ राशींना देईल त्रास

मिथुन राशी

सूर्य-शुक्र युती मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक परिस्थितीमध्ये अडचणी आणेल. त्यासोबत खर्च देखील वाढतील. लोक नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक करतील परंतु अपेक्षित प्रगती न झाल्याने नाराज राहतील. लहान भाऊ-बहिणी आर्थिक मदत मागू शकतात, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा, कुटुंबाचा राग येऊ शकतो.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Shukra Budh Labh Yog
चार दिवसानंतर अचानक पलटणार या ३ राशींचे नशीब, शुक्र-बुधच्या लाभ दृष्टीचा दुर्मिळ योग
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

( हे ही वाचा: September Planet Transist: सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या हालचालीत होणार मोठा बदल; ‘या’ ४ राशींचे नशीब अचानक पालटणार)

कर्क राशी

सूर्य-शुक्र युती कर्क राशीच्या लोकांसाठी खर्च वाढवेल. बजेट बनवा नाहीतर नाराज होऊ शकता. गळ्याशी संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे तळलेले खाऊ नका. कोणतेही नुकसान अपेक्षित नाही. या काळात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांनी हे १५ दिवस खूप सावध राहावे. विशेषतः या काळात गुंतवणूक करू नका. नुकसान होऊ शकते. अनावश्यक खर्च तुम्हाला त्रास देतील. या काळात नातेसंबंध बिघडू शकतात. प्रकरणे अतिशय काळजीपूर्वक हाताळा. लव्ह लाईफमध्येही उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे काळजी घ्या.

( हे ही वाचा: Astrology: जन्मकुंडलीत दडले आहे तुमच्या भक्तीचे रहस्य; कुंडलीतून जाणून घ्या व्यक्तीची देवाप्रती असलेली भक्ती)

मकर राशी

मकर राशीच्या लोकांना जीवनाच्या अनेक क्षेत्रात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्ही मेहनत कराल पण त्याचे फळ मिळणार नाही. मात्र त्यामुळे हार मानू नका, धीर धरा. काही वाईट बातम्या त्रासदायक ठरू शकतात. मात्र धीराने प्रत्येक गोष्टी हाताळण्यास सर्व प्रश्न मार्गी लागतील.

मीन राशी

सूर्य-शुक्र संयोग मीन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये अडचणी आणू शकतात. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय यावेळी घेऊ नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. कामात अडचणी येऊ शकतात. विवाहित लोकांचे सासरच्या लोकांशी संबंध बिघडू शकतात. रागावर नियंत्रण ठेवणे यावेळी कधीही चांगले असेल.

Story img Loader