Venus Transit in Meen: शुक्र ग्रहाला वैभव, धन-दौलत, सुख-सुविधा, भोग-विलास आणि प्रेमाचा कारक ग्रह मानला जातो. हा असा महत्त्वपूर्ण ग्रह आहे, ज्याच्या शुभ प्रभावामुळे एखादा व्यक्ती राजासारखे अलिशान जीवन जगू शकतो. शुक्राचे मीन राशीत ३१ मार्चला गोचर झाले आहे. सध्या शुक्र गुरूच्या मीन राशीतून गोचर करत आहे. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. त्यामुळे हे गोचर खास आहे. २३ एप्रिलपर्यंत शुक्र मीन राशीत असेल. यासह शुक्राची या राशीत राहूबरोबर युती झाली आहे. यासह शुक्राने तीन राजयोगही निर्माण केले आहे. शुक्राने लक्षमी नारायण राजयोग, विपित राजयोग आणि मालव्य राजयोग असे तीन राजयोग घडवून आणले आहे. त्यामुळे काही राशींना अपार यश, सुख आणि पैसा मिळण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे सुखाचे दिवस?

तूळ राशी

तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते. यावेळी तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करु शकाल. समाजात तुमचा मान-सन्मानही वाढू शकतो.

(हे ही वाचा : ४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा )

धनु राशी

धनु राशीच्या लोकांना तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिक लोकांना अधिक यश मिळू शकतो. तसेच भागीदारीत केलेल्या व्यवसायातही नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात.

मिथुन राशी

तीन राजयोगाच्या निर्मितीमुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. करिअर आणि नोकरदार लोकांना यावेळी प्रगती दिसून येऊ शकते. या काळात रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी अनेक प्रकारच्या सकारात्मक गोष्टी घडू शकतात. या राशींच्या व्यक्तींना अनेक प्रकारचे भौतिक सुख मिळण्याची शक्यता असून व्यवसायामध्ये देखील चांगला नफा होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)