Venus Uday In Meen : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक कालावधीनंतर उदय आणि अस्त होतो ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि देश जगावर होतो. धन संपत्तीचा कारक शुक्र ग्रह होळी नंतर २३ मार्चला उदित होणार आहे.
शुक्र ग्रह गुरूचा स्वामित्व असलेल्या मीन राशीमध्ये उदित होणार आहे. अशात शुक्र ग्रह उदित झाल्याने त्याचा परिणाम राशिचक्रातील सर्व राशींवर दिसून येईल पण तीन अशा राशी आहेत ज्यांना या वेळी नवीन नोकरी मिळू शकते तसेच करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याचे योग जुळून येतील. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या आहेत.
कर्क राशी (Cancer Zodiac)
या लोकांसाठी शुक्र देवाचे उदय होणे लाभदायक ठरू शकते. कारण शुक्र देव या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये भाग्य भावात उदित होणार आहे. त्यामुळे या वेळी या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो. तसेच या लोकांची सामाजिक प्रगती होऊ शकते.
या लोकांची समाजात एक नवीन प्रतिमा दिसून येईल. तसेच हे लोक काम व्यवसायासंबंधित प्रवास करू शकतात. या दरम्यान या लोकांना धर्म कर्माच्या कार्यांमध्ये आवड वाढू शकते. तसेच या वेळी स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे पास होऊ शकतात. हे लोक विदेशात जाऊ शकतात.
मिथुन राशी (Mithun Zodiac)
शुक्र देवाचे उदित होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण शुक्र देव या राशीच्या गोचर कुंडलीमधून करिअर आणि व्यवसाय स्थानावर उदित होणार आहे. त्यामुळे या वेळी काम आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. या लोकांना विचारशक्ती वाढेन. या लोकांना या दरम्यान घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात.
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. सहकाऱ्यांची साथ मिळेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. नवीन कार्य करण्याचा विचार येईल आणि त्यामध्ये यशस्वी व्हाल. या दरम्यान व्यवसायात चांगला धनलाभ मिळू शकतो.
कुंभ राशी (Kumbh Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचे उदित होणे सकारात्मक सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र ग्रह या राशीच्या दुसऱ्या भावात उदित होणार आहेत त्यामुळे या वेळी या लोकांना आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. तसेच या दरम्यान या लोकांना सरकारी कामाशी संबंधित चांगली वार्ता मिळू शकते. तसेच या दरम्यान या लोकांना पितृ संपत्तीचा लाभ सुद्धा मिळू शकतो.
या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होऊ शकते. नातेवाईकांबरोबर संबंध सुधारतील. व्यवसायात पुढे जाण्यासाठी नवीन योजना बनू शकता आणि त्याचा लाभ मिळू शकतो. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)