ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर नक्कीच प्रभाव टाकतात. याच संदर्भात, धन आणि ऐश्वर्याचा कारक असलेला शुक्र प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. त्यामुळे १२ राशींच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो. शुक्र हा प्रेम, आकर्षण, धन-वैभव, ऐश्वर्य आणि मान-सन्मानाचा प्रमुख कारक मानला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नववर्ष २०२५ मध्ये शुक्र त्याच्या उच्च मीन राशीत प्रवेश करणार आहे. या प्रवेशामुळे शक्तिशाली मालव्य राजयोगाची निर्मिती होईल. ज्यामुळे काही राशींच्या लोकांचे नशीब पालटू शकते. हा राजयोग कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो.

मालव्य राजयोगाची सुरुवात कधी?

द्रिक पंचांगानुसार, शुक्र २८ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करेल. याच वेळी मालव्य राजयोगाची निर्मिती होईल. या योगामुळे काही राशींच्या लोकांना प्रचंड आर्थिक लाभ होईल.

मकर राशी (Capricorn)

मकर राशीच्या तृतीय भावात शुक्र मालव्य राजयोगाची निर्मिती करतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रचंड फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कार्यात यश मिळेल. पदोन्नतीसह वेतनवाढ होईल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कोर्टातील प्रकरणे तुमच्या बाजूने येतील.

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीत चौथ्या भावात मालव्य राजयोगाची निर्मिती होईल. त्यामुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. घर, गाडी किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. पितृपक्षाकडून संपत्ती मिळण्याचे योग संभवतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नव्या आर्थिक संधी उपलब्ध होतील, तसेच बचतही करता येईल. व्यापारात मोठ्या ऑर्डर किंवा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवन आनंददायक राहील.

कर्क राशी (Cancer)

कर्क राशीत नवव्या भावात मालव्य राजयोग होतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रांत यश मिळेल. आर्थिक स्रोत वाढतील, तसेच बचतीचे प्रमाणही वाढेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. अध्यात्मिकडे कल वाढेल आणि धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेण्याची संधी मिळेल.

याशिवाय, २०२५ मध्ये मीन राशीत लक्ष्मी-नारायण योगाचीही निर्मिती होणार आहे, ज्यामुळे काही विशिष्ट राशींना प्रचंड लाभ होईल.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus will create malviya raja yoga in 2025 the fate of these zodiac signs will be decided there will be sudden big financial gains snk