Vidhan sabha election 2024: विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. सर्वाधिक खासदार निवडून आल्यामुळे भारतात पुन्हा भाजपाचे सरकार आले. पण, आता येत्या काळात होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह देशाचेदेखील लक्ष लागून राहिले आहे.

“कोण होणार मुख्यमंत्री?….” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या पूर्वीच्या लेखामध्ये आपण येत्या निवडणूकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणाचा पक्ष बाजी मारणार याची चर्चा केली होती. या दुसऱ्या लेखात अजित पवारांच्या निवडणूकीतील भविष्याबाबत आपण चर्चा करणार आहोत.

सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दोघे उपमुख्यमंत्री असून हे तिन्ही मंत्री राज्याचा कार्यभार सांभाळत आहेत. पण, लवकरच होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची महायुती राज्यात सरकार स्थापन करू शकेल का? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाप्रमाणे अजित पवारांचा पक्षदेखील आपल्या जागा निवडून आणेल का? मागील लेखात दिल्याप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा पक्ष जवळपास ५० किंवा त्याहून अधिक जागा सहज जिंकू शकतो. तसेच देवेंद्र फडणवीसांचा पक्ष ८० हून अधिक जागा जिंकू शकतो. त्यामुळे अजित पवारांचा पक्ष किती जागा जिंकेल? याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: “कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी

अजित पवारांच्या पक्षाचे भविष्य

अजित पवारांनी जुलै २०२३ मध्ये महायुतीमध्ये प्रवेश करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानुसार शपथविधीच्या कुंडलीचे विवेचन केल्यास वृषभ राशीतील गुरू त्यांच्या शपथविधी कुंडलीच्या सप्तमातून भ्रमण करत आहे. परंतु, राहूचे भ्रमण मीन राशीतून सुरू असून, त्यांचा शपथविधी कुंडलीतील रवीच्या केंद्रात असल्यामुळे त्यांना हवे तसे अपेक्षित यश मिळणार नाही. शिवाय काही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामनादेखील करावा लागू शकतो.

तसेच येत्या काळात महाविकास आघाडी आणि महायुती यांप्रमाणेच इतर काही नवीन पक्षांची युती निर्माण होण्याचीदेखील दाट शक्यता आहे.