Upcoming Chief Minister: आपल्या भविष्यात काय होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्रांचे राशी परिवर्तन आणि कुंडलीत शुभ-अशुभ योगांच्या माध्यमातून व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज वर्तवला जातो. त्याशिवाय फक्त व्यक्तीचाच नव्हे, तर एखाद्या राजकीय नेत्याच्या कुंडलीवरून त्यांच्या राजकीय पक्षाचे भविष्यदेखील सांगितले जाते. २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून (आज) २३ नोव्हेंबर रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर होत आहे, सध्या मतमोजणीचे कार्य सुरू असून राज्याची जनता कोणाच्या बाजूने उभी राहील, हे काही तासांत कळेल. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. सर्वाधिक खासदार निवडून आल्यामुळे भारतात पुन्हा भाजपाचे सरकार आले. पण, आता येत्या काळात होणाऱ्या राज्य विधानसभेच्या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह देशाचेदेखील लक्ष लागून राहिले आहे.

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? (Chief Minister Eknath Shinde)

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपाबरोबर हातमिळवणी केल्यानंतर ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत त्यांनी बदल घडवले. त्यांच्या कामाचे काहींनी कौतुक केले; तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकादेखील केली. पण, कुंडलीनुसार येत्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्यात नक्की काय घडणार? त्यांचा पक्ष अपेक्षित जागा जिंकेल का? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील का? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

Winner Candidate List Maharashtra Assembly Election Result
Maharashtra Assembly Election Results 2024 Live Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट; कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा एका क्लिकवर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Surya Shani Kendra Drishtisun and saturn 90 degree these zodiac sign will be shine
सूर्य आणि शनीची केंद्र दृष्टीमुळे ४ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! आयुष्यात आनंदी आनंद
Mangal Kark Rashi Parivartan 2024
नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रमोशन आणि धनसंपत्तीचे सुख
Winner Candidate List Maharashtra Assembly Election Result
Maharashtra Election Winner Candidate List: भाजपाच्या विजयरथाची राज्यव्यापी घोडदौड, महायुतीला बहुमत; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी!
Vidhan Sabha Election 2024
अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळविण्यात अडचणी- ज्योतिषांची भविष्यवाणी
Mahim Assembly Election Results 2024 Live Updates in Marathi_ Mahim Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates
Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : अमित ठाकरे पराभूत, राज ठाकरेंना मोठा धक्का

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेमध्ये त्यांना गुरूचे चांगले पाठबळ मिळत असून, हा गुरू पुढील वर्षाच्या मे महिन्यात बदलत आहे. तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना गुरूचे चांगले पाठबळ मिळेल. तसेच यामुळे या काळात त्यांचा पक्षदेखील चांगली प्रगती करण्याची शक्यता आहे. खरं तर, एकनाथ शिंदे यांच्या पत्रिकेत शनी हा त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये कुंभेचाच असल्यामुळे त्यावरून शनीचे भ्रमण होत आहे. म्हणून या शनीचे पाठबळसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीतील वरील ग्रहांचे स्थान पाहता, येत्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा पक्ष जवळपास ५० किंवा त्यातून अधिक जागा सहज जिंकू शकतो, असा अंदाज वर्तवता येऊ शकतो.

हेही वाचा: “..तर फडणवीस यश खेचून आणतील”, ज्योतिषतज्ज्ञांची भविष्यवाणी; म्हणाले, “महाराष्ट्रात पक्ष बदनाम..”

देवेंद्र फडणवीस बाजी मारणार का? (Deputy Chief Minister devendra fadnavis)

विधानसभा निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीबद्दल सांगायचे झाल्यास, फडणवीस यांच्या कुंडलीमध्ये गुरूचे भ्रमण वृषभ राशीतून सुरू आहे आणि हे भ्रमण त्यांच्यासाठी अनुकूल ठरेल. फक्त सध्या त्यांच्या कुंडलीत साडेसाती आणि त्यातच केतूची महादशादेखील सुरू आहे. त्यांच्या कुंडलीतील ही केतूची महादशा मार्च २०२५ पर्यंत असेल. त्यानंतर राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्यांना हवे तसे यश मिळाल्याचे पाहायला मिळू शकते. त्यामुळे फडणवीस यांच्या कुंडलीच्या सप्तमातून राहू आणि नेपच्युनचे भ्रमण सुरू असल्यामुळे येत्या निवडणुकीत त्यांना १०५ जागा जिंकणे कठीण ठरू शकते, त्यांचा पक्ष केवळ ७० ते ८० जागांपर्यंतच मजल मारू शकतो, असा अंदाज आहे.

परंतु, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची युती त्यांना मिळून (५०+८०) अशा १३० जागा निवडून देऊ शकते.