Vijay Ekadashi 2025 Today Horoscope : २४ फेब्रुवारी रोजी माघ कृष्ण पक्षातील विजय एकादशी आणि सोमवार आहे. ही एकादशी तिथी सोमवारी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहील. तर २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजून ५ मिनिटांपर्यंत सिद्ध योग राहील. सिद्धी योगात कोणत्याही कामाची सुरुवात केल्यास निश्चितपणे यश मिळते असे मानले जाते. यासह सोमवारी सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत पूर्वाषाढा नक्षत्र जागृत असेल. पूर्वाषाढा नक्षत्र हे आकाशात असलेल्या २७ नक्षत्रांपैकी २० वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी शुक्राचार्य आहे.

तसेच आजच्या विजया एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. असे मानले जाते की, युद्धात लंकेचा राजा रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने विजया एकादशीचे व्रत केले होते. या व्रतामुळे सर्व पापांपासून मुक्ती आणि मोक्ष मिळतो. त्यामुळे ही विजया एकादशी १२ राशींच्या लोकांना कशी जाईल, कोणत्या राशींच्या नशीबी सुख, समृद्धी सौभाग्य लाभेल जाणून घेऊ…

२४ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य ( 24 february 2025 Horoscope Panchang & Rashi Bhavishya)

मेष:- घरात नातेवाईक गोळा होतील. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल.

वृषभ:- व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.

मिथुन:- चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये.

कर्क:- दिवस स्व‍च्छंदीपणे घालवाल. अति विचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.

सिंह:- छुप्या शत्रूंवर जय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल.

कन्या:- जवळच्या लोकांचा विश्वास संपादन करावा. नसत्या गोष्टीत अडकू नका. दिवस आळसात जाईल. स्वत:चा मानसिक गोंधळ उडवून घेऊ नका. पैशाचा योग्य विनिमय करावा.

तूळ:- नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. हातात नवीन अधिकार येतील. पराक्रमाला अधिक बळ मिळेल. तुमच्या कामाच्या कक्षा रुंदावतील. भावंडांशी मतभेद संभवतात.

वृश्चिक:- तुमचा मान वाढेल. हातातील कामात यश येईल. आर्थिक गणिते सुटतील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. हित शत्रूंवर मात करता येईल.

धनू:- आपले विचार उत्तमरीत्या मांडाल. चिंतन करण्यात वेळ घालवाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नवीन गोष्टी जाणून घ्याल. आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करता येईल.

मकर:- शांत व स्थिर विचार करावा. आवक-जावक यांचा मेळ घालावा. अनाठायी खर्च टाळावा. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. धार्मिक यात्रेचे आयोजन करावे.

कुंभ:- कामात तत्परता दाखवाल. सर्व गोष्टी उत्तमरीत्या जाणून घ्याल. जास्त चिकित्सा करू नका. हटवादीपणा करू नये. हजरजबाबीपणा दाखवाल.

मीन:- कागदपत्रे जपून ठेवावीत. घराबाहेर वावरतांना सावधानता बाळगावी. जुगाराची आवड पूर्ण कराल. स्वतंत्र वृत्ती दर्शवाल. गायन कलेचे कौतुक केले जाईल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader