Vijaya Ekadashi 2025: हिंदू धर्मामध्ये विजया एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर वर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला विजया एकदशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते.

असं म्हणतात हा उपवास ठेवल्याने शत्रुंवर विजय मिळतो आणि जीवनात यश प्राप्त होऊ शकते. असं म्हणतात लंकावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने हा व्रत केला होता. ज्योतिषशास्त्राच्या मते यंदाची विजया एकदशी खूप खास आहे. कारण या दिवशी शुभ योग निर्माण होत आहे, हा योग काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो.

हिंदू पंचाग नुसार, या वर्षीची विजया एकादशी २४ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे, या दिवशी सिद्धी शुभ योग निर्माण होणार आहे, हा व्रत आणि या दिवशी पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. विजया एकादशीच्या दिवशी सकाळ पासून १०.४५ मिनिटांपर्यंत सिद्धी योग निर्माण होत आहे. त्यानंतर व्यातीपात योग निर्माण होणार.

कोणत्या राशींना फायदा होईल, जाणून घेऊ या.

मेष राशी (Mesh Rashi)

विजया एकादशीच्या दिवशी निर्माण होणारा शुभ योग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या लोकांचे नशीब चमकू शकते. या दरम्यान या लोकांच्या भाग्यामध्ये वृद्धी होऊ शकते. विष्णुच्या कृपेने या लोकांना व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. आरोग्याच्या समस्या दूर होतील. अभ्यास करणाऱ्यांना यश मिळू शकते. पैसा गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.या लोकांचा आत्मविश्वास वाढेन.

सिंह राशी (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा वेळ पैसा आणि नात्यात सुधारणा घेऊन येणारा असेल. जोडीदाराबरोबर या लोकांचे नाते आणखी दृढ होईल. कामामध्ये यश मिळू शकते. ऑनलाइन काम करणाऱ्या लोकांना पगार मिळू शकतो. प्रेमाच्या नात्यात चांगला बदल होऊ शकतो. प्रवासाचे योग निर्माण होत आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला पगार मिळू शकतो. सिंगल लोकांना विवाहाचे योग जुळून येईल.

मीन राशी (Meen Rashi)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ घरात आनंद घेऊन येणारा असेल. प्रेम करणाऱ्याबरोबर नवीन कामाची सुरुवात होऊ शकते. कार्यक्षेत्रामध्ये सहकारी या लोकांची मदत करेन. नोकरीमध्ये प्रगतीचे योग जुळून येईल. वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतील. विष्णूच्या कृपेने धनलाभ होईल

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader