Vijaya Ekadashi 2025: वैदिक पंचांगनुसार, सोमवार २४ फेब्रुवारीला विजया एकादशी आहे. विजया एकादशी दरवर्षी फाल्गुन महिन्यामध्ये साजरी केली जाते. या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते. तसेच मनाप्रमाणे वरदान प्राप्त करण्यासाठी एकादशीचा उपवास केला जातो. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रानुसार विजया एकादशीच्या दिवशी चंद्र देव धनु राशीमध्ये विराजमान राहणार आहे. या राशीमध्ये चंद्र देव विराजमान राहिल्याने अनेक राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. दोन राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. मनाप्रमाणे व्यवसायात यश मिळू शकते. (Vijaya Ekadashi 2025 three zodiac get double profit and their luck will shine like gold)

वृषभ राशी

विजया एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. यश आणि किर्तीमध्ये वृद्धी होईल. व्यवसायात तेजी दिसून येईल. दुप्पट फायदा मिळू शकतो. सासरच्या लोकांना धनलाभ मिळू शकतो. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

शुभ कार्यात यश मिळेन. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. प्रिय मित्रांचे सहकार्य मिळेन. तसेच कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. नवीन काम सुरू करण्याची प्लानिंग करू शकतात. देव दर्शनासाठी मंदिरात जाऊ शकतात.

कन्या राशी

विजया एकदाशीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांवर चंद्र देवाची विशेष कृपा दिसून येईल. चंद्राच्या कृपेने भुमि आणि भवन प्राप्त होऊ शकते. नवीन गाडी खरेदी करण्याचा योग जुळून येईल. आई वडिलांची काळजी घ्यावी लागेल.
धन प्राप्तीसाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. यात्रेचे योग जुळून येईल. या लोकांच्या चाहत्यांमध्ये वाढ होईल. प्रेम प्रकरणात पडलेल्या व्यक्तींना जोडीदाराकडून प्रेम मिळेल. मानसिक तणाव कमी होईल. सर्व गोष्टी या लोकांच्या मनाप्रमाणे घडतील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)