Daily Horoscope in Marathi : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच ३ जानेवारी २०२५ रोजी एक खास दिवस असणार आहे. आज पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी रात्री ११वाजून ४० मिनिटांपर्यंत असणार आहे . वज्र योग आज दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत जुळून येईल . रात्री १० वाजून २२ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे. याशिवाय आज विनायक चतुर्थी असणार आहे. तर आज बाप्पा कोणाच्या आयुष्यात आनंद आणि गोडवा घेऊन येणार हे आपण जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३ जानेवारी पंचांग व राशिभविष्य :

मेष:- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेऊन चालाल. धार्मिक कार्याची आवड निर्माण होईल. कुटुंबातील लोकांसमवेत प्रवास कराल. आर्थिक प्रगती साधता येईल.

वृषभ:- आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. फार काळजी करत बसू नये.

मिथुन:- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.

कर्क:- कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक स्तरावर बोलताना भान राखावे. कोणालाही शब्द देऊ नका.

सिंह:- प्रेम जीवनात सुखद अनुभव मिळतील. सहवासाचा आनंद लुटाल. मनातील भावना मांडता येतील. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील.

कन्या:- आज देवीचा आशीर्वाद मिळेल. मनातील इच्छेला मूर्त रूप द्याल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी. घरातील टापटीप कटाक्षाने पाळाल.

तूळ:- आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. विना संकोच बोलाल. जवळच्या मित्रांना घरी बोलवाल. निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्याल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:- बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. आवडीचे पदार्थ चाखाल. कौटुंबिक जीवनात काही सुखद अनुभव येतील. दिवस मनाजोगा घालवाल.

धनू:- आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. आवडते छंद जोपासाल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा.

मकर:- आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केन्द्रित करावे. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

कुंभ:- आजचा दिवस आनंदात जाईल. बरेच दिवस रेंगाळत असलेली इच्छा पूर्ण होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन:- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak chaturthi on 2 january 2025 bappa will give happiness to zodiac signs read horoscope in marathi asp