Vinayaka Chaturthi Special 3 March Horoscope : ३ मार्च २०२५ रोजी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे . चतुर्थी तिथी सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत राहील. शुक्ल योग सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर ब्रह्मयोग जुळून येईल. तसेच मंगळवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत अश्विनी नक्षत्र जागृत असेल. आज राहू काळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय आज विनायक चतुर्थी (Vinayaka Chaturthi) असणार आहे. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन वेळा गणेश चतुर्थी असते, यातील पहिल्या पंधरवड्यातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटले जाते. तर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाप्पा १२ राशींना कसा आशीर्वाद देणार हे आपण जाणून घेऊया..

३ मार्च पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Horoscope ) :

मेष:- दिवस सौख्याचा असेल. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. जोडीदाराचे प्रेमळ सुख मिळेल. भागीदारीत चांगला नफा होईल. मोठ्या लोकात ऊठबस होईल.

वृषभ:- कामाचा चांगला आनंद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. जवळच्या नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काही बाबींची गुप्तता पाळाल.

मिथुन:- स्त्रियांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवाल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. जोडीदाराचे वर्चस्व राहील. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. करमणुकीत वेळ घालवाल.

कर्क:- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. कौटुंबिक सौख्य वृद्धिंगत होईल. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. घराची सजावट कराल. तुमच्यातील सुप्त गुण दिसून येतील.

सिंह:- जवळचा प्रवास मजेत पार पडेल. भावंडांची उत्तम साथ मिळेल. उत्तम साहित्य वाचनात येईल. काहीसे लहरीपणे वागाल. चारचौघात मिळून-मिसळून वागाल.

कन्या:- कौटुंबिक वातावरणात रमून जाल. चैनीवर खर्च कराल. सर्वांशी मधाळ बोलाल. गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल. पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल.

तूळ:- वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. दिवस छानछोकीत घालवाल. प्रेमळ मैत्री लाभेल. प्रेमप्रकरणातील सौख्याला बहर येईल. सौंदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल.

वृश्चिक:- मनात उगाच चिंता लागून राहील. घरातील ताणतणाव दूर करावेत. आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करू नये. छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा. अति वाहवत जाऊ नका.

धनू:- घरात मंगलकार्ये घडतील. स्वत:ची मानसिक शांतता जपावी. समोर आलेली कामे मन लावून करावीत. उत्तम व्यावसायिक लाभ होईल. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका.

मकर:- वारसाहक्काची कामे मार्गी लावाल. उगाच नैराश्याला बळी पडू नका. कामाची घाई गडबड राहील. कामात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. जास्त चिकित्सा करत बसू नका.

कुंभ:- प्रकृती काहीशी नरमगरम राहील. पित्तविकार वाढू शकतो. कामात क्षुल्लक कारणावरून अडथळे येवू शकतात. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. शांतपणे विचार करावा.

मीन:- कामाचे प्रशस्तिपत्रक मिळेल. मनातील इच्छांची पूर्तता होईल. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधारेल. शेअर्समधून चांगली कमाई करता येईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader