सोनल चितळे

Virgo Annual Horoscope 2025 : कन्या ही बुधाची रास आहे. उत्तम बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती, तसेच हजरजबाबीपणा हे कन्या राशीचे गुणविशेष आढळतात. कन्या राशीच्या व्यक्तींकडे परीक्षण आणि निरीक्षण अतिशय बारकाव्यांसह करण्याची क्षमता असते. त्यांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती खूप चांगली असते. योजना आखणे आणि नियोजन करणे या त्यांच्या अंगात मुरलेल्या गोष्टी आहेत. अशा या कन्या राशीला २०२५ हे वर्ष कसे जाईल याचा आढावा घेऊ…

कन्या राशीच्या दृष्टीने वर्षभरातील महत्त्वाच्या ग्रहांचे राशिबदल असे आहेत. १८ मार्चला हर्षल अष्टमातील मेष राशीतून भाग्य स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करील. २९ मार्चला शनी षष्ठ स्थानातील कुंभ राशीतून सप्तमातील मीन राशीत प्रवेश करील. १४ मे रोजी गुरू भाग्य स्थानातील वृषभ राशीतून दशमातील मिथुन राशीत प्रवेश करेल. तर, २९ मे रोजी राहू आणि केतू वक्र गतीने षष्ठातील कुंभ राशीत व व्यय स्थानातील सिंह राशीत प्रवेश करतील.

budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ratha Saptami 2025
Ratha Saptami 2025: रथ सप्तमीला सूर्याला प्रसन्न करण्यासाठी कशी करावी पूजा? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
Guru Margi 2025
३ दिवसानंतर ‘या’ पाच राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार, गुरूच्या कृपेने मिळेल अपार पैसा, धन- संपत्ती अन् यश
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Venus Transit Impact on Mauni Amavasya 2025
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येला शुक्राचे मीन राशीत भ्रमण, ‘या’ ३ राशींना नोकरी आणि व्यवसायात प्रचंड लाभाची संधी
Surya Shani Yuti 2025
Surya Shani Yuti 2025: पिता-पुत्रांची होणार युती, सूर्य-शनिचा दुर्लभ योग ‘या’ चार राशींना देईल बक्कळ धनलाभ? गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत

कन्या राशीसाठी २०२५ वर्ष कसे असणार? जाणून घ्या (Virgo Yearly Horoscope 2025)

जानेवारी (January Horoscope 2025)

नव्या वर्षाची सुरुवात नव्या उत्साहात होईल. नवे संकल्प सुरू कराल; पण त्यातील सातत्य टिकले, तरच त्याचा लाभ होईल. विद्यार्थ्यांनी मात्र अभ्यासातील सातत्य टिकवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या विषयांवर वैचारिक मंथन आणि संशोधन कराल. उच्च शिक्षणासाठी परदेशगमनाचा योग आहे. नोकरी-व्यवसायात आपल्या बुद्धिमत्ता आणि कलात्मकतेचा ठसा उमटवाल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. उत्तम गुरुबल असल्याने विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्यांना प्रवास योग येईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल. मकर संक्रांत अतिशय लाभकारक ठरेल. प्रॉपर्टीचे काम मनाजोगते होईल. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे.

फेब्रुवारी (February Horoscope 2025)

दिलेला शब्द पाळणे खूप महत्त्वाचे ठरेल. कामकाजाच्या व्यापात मित्रमंडळींना भेटणे म्हणजे आपल्यासाठी पर्वणीच असेल. महाशिवरात्रीदरम्यान मोलाचे भावूक क्षण अनुभवाल. विद्यार्थ्यांनी ध्येयाच्या मागे लागायला हवे. अभ्यासासोबत बारीकसारीक गोष्टी आणि परीक्षेचे तंत्र आत्मसात कराल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. याचा भावी आयुष्यात खूप उपयोग होईल. विवाहोत्सुकांना आपल्या पसंतीचा जोडीदार निवडता येईल. विवाहित दाम्पत्यांमध्ये सहवासाने ओढ वाढेल. एकमेकांच्या विचारांचा आदर कराल. घराचे व्यवहार होतील. गुंतवणुकीचा लाभ मिळेल. दूरदृष्टीने आर्थिक नियोजन कराल. पोटदुखी आणि अपचन त्रासदायक ठरेल.

हेही वाचा…४ जानेवारी पंचांग: सिद्धी योगात ‘या’ राशींची वेगात होतील कामे; चारचौघात कौतुक, कौटुंबिक सौख्य, अचानक धनलाभ; तुमचे नशीब आज तुम्हाला काय देणार?

मार्च (March Horoscope 2025)

मोठी जबाबदारी पेलणारा आणि उत्साह वाढवणारा हा महिना असेल. विद्यार्थ्यांना वर्षभराच्या अभ्यासाची खरी कसोटी पार पाडावी लागेल. गुरुबल चांगले असल्याने मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. होळीमध्ये अनावश्यक शंकाकुशंका टाकून द्याल. नोकरी-व्यवसायात सतत कामाच्या विचारांनी डोके शिणेल. १८ मार्चला हर्षल भाग्यातील वृषभ राशीत प्रवेश करेल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग कराल. प्रवास योग येतील. विवाहोत्सुकांना स्थळे येतील. संततीप्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. २९ मार्चला शनी सप्तमातील मीन राशीत प्रवेश करेल. महिनाअखेरीला आलेला गुढीपाडवा उत्साह निर्माण करेल. शुभ वार्ता समजेल. वडिलोपार्जित जमीनजुमल्याचा न्यायालयाच्या मदतीने योग्य तो निवाडा होईल. ऋतुबदलाची सर्दी हे आरोग्याचे लक्षण समजावे.

एप्रिल (April Horoscope 2025)

निर्धार करणारा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणारा असा हा महिना असेल. गुरुबल चांगले असल्याने आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. विद्यार्थी वर्ग जिद्दीने आगेकूच करेल. विषयातील बारकावे आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी नेमक्या नमूद कराल. नोकरी-व्यवसायात उत्तम प्रगती कराल. मनस्थिती द्विधा होऊ देऊ नका. अक्षय्य तृतीया समृद्धी घेऊन येईल. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित दाम्पत्यांना विवाहसुख मिळेल. एकमेकांच्या गुणांची कदर कराल. घराचे व्यवहार कायदेशीर मार्गाने पूर्ण कराल. न्यायालयीन कामे लांबणीवर पडतील. गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीसाठी पैसा गुंतवावा. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींवर वैद्यकीय उपचार घ्यावा लागेल.

मे (May Horoscope 2025)

या महिन्यात गुरूचा राशिबदल खूप महत्त्वाचा आहे. १४ मे रोजी गुरू दशम स्थानातील मिथुन राशीत प्रवेश करेल. गुरुबल थोडे कमी होईल. विद्यार्थी आपल्या नव्या प्रकल्पावर मनापासून मेहनत घेतील. नोकरी-व्यवसायात स्वतःची छाप उमटवाल. आपल्या प्रभावी भाषणाचा परिणाम दिसून येईल. बुद्ध पौर्णिमा आर्थिक धनलाभ करून देईल. विवाहोत्सुकांनी जोडीदार संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावेत. विवाहित दाम्पत्यांनी आपल्यातील गैरसमज दूर करावेत. वाहन खरेदी व वाहनसुख चांगले मिळेल. घराचे काम पूर्ण होईल. गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ मिळाला नाही तरी मोठे नुकसान होणार नाही. राहू कुंभेत व केतू सिंहेत वक्र गतीने प्रवेश करतील.

जून (June Horoscope 2025)

नवनवीन उपक्रम राबवणारा आणि खूप नव्या गोष्टींना वाव देणारा असा हा महिना असेल. तुमच्यातील चांगले गुण इतरांना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी वर्ग नव्या शैक्षणिक वर्षाचा पुढचा प्रवास उत्साहात सुरू करेल. नोकरी-व्यवसायात मित्रांची साथ मिळेल. त्यांच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. विवाहोत्सुक मुलामुलींना योग्य जोडीदार मिळेल. ओळखीतून स्थळ मिळेल. विवाहित दाम्पत्यांमध्ये वाद निर्माण होतील. रुसवे-फुगवे होतील. वटपौर्णिमा आपल्यातील वाद मिटवण्यास उपयोगी ठरेल. कायदेशीर कार्यवाही करताना नियम पाळाल. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. उत्सर्जन संस्थेची समस्या उदभवेल.

हेही वाचा…Numerology Predictions Number 4: ‘या’ जन्मतारखा श्रम,बुद्धीच्या जोरावर मिळवणार यश; पण काही गोष्टींपासून ठेवा अंतर; ज्योतिषांनी सांगितली भविष्यवाणी

जुलै (July Horoscope 2025)

सगळी कामे आपल्या मनाप्रमाणे होतीलच, असे नाही. ज्यावर आपले नियंत्रण नाही, त्या गोष्टी आहेत तशा स्वीकारणे गरजेचे ठरेल. आषाढी एकादशीला द्विधा मनस्थिती होईल. विद्यार्थी वर्गाच्या शंकांचे निरसन होईल. अभ्यासू वृत्तीमुळे गुरुजनांचे उत्तम मार्गदर्शन लाभेल. गुरुपौर्णिमेचे चांगले फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात उत्साहवर्धक वातावरण निर्माण होईल. सहकारीवर्गाच्या वतीने त्यांच्या समस्या व्यवस्थापन मंडळासमोर प्रभावी भाषेत मांडाल. विवाहोत्सुकांनी वधू-वर संशोधन सुरू ठेवावे. ग्रहमान अनुकूल आहे. विवाहितांना एकमेकांच्या सहवासाचा लाभ सुखकर ठरेल. वादविवाद, गैरसमज दूर होतील. सरकारी कामे धीम्या गतीने पुढे जातील. पाठपुरावा केला नाहीत, तर कामे ठप्प होतील. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम स्वीकारू नये. सुरक्षित गुंतवणूक उत्तम लाभ देईल. हाडांचे विकार, ताप येणे यांमुळे चिडचिड वाढेल.

ऑगस्ट (August Horoscope 2025)

सणवार, संस्कृती, परंपरा जपणारा आणि उत्सवांनी भरलेला असा हा महिना असेल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटी नवचैतन्य देणाऱ्या असतील. नारळी पौर्णिमा उत्कर्षकारक असेल. विद्यार्थी अभ्यास सांभाळून आपल्यातील कलागुण विकसित करतील. व्यक्तिमत्त्व विकासासाठी या सामाजिक जीवनाची आपणास नितांत गरज भासेल. जन्माष्टमीच्या सुमारास आत्मविश्वास बळावेल. त्यामुळे नोकरी-व्यवसायात आपला प्रभाव पडेल. विवाहित मंडळी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पाडतील. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. परदेशातील कामांमध्ये लहान-मोठ्या गोष्टी अपूर्ण राहतील. प्रॉपर्टीचे व्यवहार पूर्ण होतील. गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. श्री गणेशाचे आगमन आरोग्यदायी ठरेल.

सप्टेंबर (September Horoscope 2025)

परदेशातील कामे, उच्च शिक्षण या संबंधातील बातमी मिळेल. शुभ वार्ता देणारा असा हा महिना असेल. पितृपक्षात नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक गोष्टी घडतील. पूर्वजांचे श्रद्धेने केलेले स्मरण लाभकारक ठरेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेत उत्तम यश मिळेल. विवाहित मंडळींना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून दाम्पत्यसुखासाठी निवांत वेळ मिळेल. घर, जमीन यांची कामे मार्गस्थ होतील. वकील, न्यायालयाच्या फेऱ्या उपयोगी पडतील. नवरात्रात गुंतवणूकदारांनी नियोजनपूर्वक केलेली गुंतवणूक खूप लाभकारक ठरेल. पोटरीतील शिरा ताठर होऊन, वेदना वाढतील. मान आखडेल. प्रदूषणामुळे डोळे लाल होणे आणि श्वसनाचा त्रास होणे या गोष्टी संभवतात.

हेही वाचा…Leo 2025 Rashi Bhavishya : २०२५ मध्ये सिंह राशींना ‘हे’ महिने अत्यंत फायद्याचे; शिक्षण, नोकरी ते विवाह, कसे असेल वर्ष? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

ऑक्टोबर (October Horoscope 2025) :

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा… याप्रमाणे खरोखरच आनंदी वातावरण असलेला हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाची कसोटी सुरू होईल. परीक्षेनंतरही अभ्यासात खंड पडू देऊ नका. सराव करत राहावे. नोकरी-व्यवसायात नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. या संधीचे सोने करणे आपल्या हाती आहे. १८ ऑक्टोबरला गुरू कर्क राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. विवाहोत्सुकांचे दिवाळीनंतर विवाह होतील. दिवाळीत आपल्या कलागुणांना वाव मिळेल. विवाहितांच्या प्रश्नांना उत्तरे मिळतील. एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. घर, वाहन, जमीन यांचे व्यवहार घाईघाईत निश्चित करू नका. गुंतवणूकदारांना कर्केतील गुरू भरभरून लाभ देईल.

नोव्हेंबर (November Horoscope 2025)

आर्थिक उन्नत्ती आणि उत्कर्ष करणारा असा हा महिना असेल. गुरुबल उत्तम असले तरी ११ नोव्हेंबरपासून गुरू वक्री होईल. विद्यार्थी वर्गाला आता धरसोड वृत्ती बाजूला सारावी लागेल. अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित कराल. नोकरी-व्यवसायात कोणाचे चूक व कोणाचे बरोबर हे बघण्यापेक्षा सत्याची बाजू स्वीकाराल. देवदिवाळी ते चंपाषष्ठीपर्यंत महत्त्वाच्या आर्थिक उलाढाली पूर्ण होतील. विवाहोत्सुकांना सुयोग्य जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांना संततीप्राप्तीचा योग आहे. घराचे काम काही कारण नसतानाही लांबणीवर जाईल. गुंतवणूकदारांनी थोडे धीराने घ्यावे. हवामानातील अनपेक्षित बदलामुळे त्वचाविकार बळावतील. औषधोपचार घेण्याशिवाय पर्याय नाही.

डिसेंबर (December Horoscope 2025)

संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा पडताळून बघण्याचा हा महिना असेल. वर्षभरात ज्यांनी मदत केली आहे अशा सर्वांचे आभार मानाल. श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण असेल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासह कला, क्रीडा, सहल यांच्यात मग्न असेल. बौद्धिक व वैचारिक मंथन याकडे आकर्षित व्हाल. ५ डिसेंबरला गुरू वक्र गतीने मिथुन राशीत प्रवेश करेल. नोकरी-व्यवसायात विशेष योजना आखाल. सहकारी वर्ग आणि वरिष्ठ वर्ग यांच्यातील दुवा बनाल. प्रभावी वक्तव्यामुळे काम फत्ते होईल. कुटुंबातील व्यक्तींना आपला आधार वाटेल. घराविषयीचे निर्णय लांबणीवर जातील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक कृती

अशा प्रकारे २०२५ हे वर्ष गुरुबलाच्या दृष्टीने उत्तम असेल. अनेक कामे मार्गी लागतील. शिक्षण, विवाह, संतती यांबाबत प्रगतीकारक वर्ष असेल. घर, जमीन, मालमत्तेचे व्यवहार करताना घाई न करता सावधगिरी बाळगाल. अतिचिकित्सा केल्यास कामे पुढे सरकणार नाहीत हे ध्यानात असू द्यावे. एकंदरीत वर्ष आनंदाचे आणि उत्कर्षाचे जाईल.

Story img Loader