Magh Purnima 2024: हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमाला अतिशय खास योग जुळून आला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, २०२४ मध्ये माघ पौर्णिमा म्हणजेच माघ महिन्याची पौर्णिमा २४ फेब्रुवारी २०२४ रोजी आहे. ही कन्या राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पौर्णिमा कन्या राशीत होत असते, तेव्हा अनेक लाभ मिळत असतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे बुधग्रहाचा शुभ परिणाम राशींवर होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात माता लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी

वृषभ राशीच्या मंडळीसाठी माघ पौर्णिमा लाभदायी ठरु शकते. व्यापारातून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. जे लोक नोकरदार आहेत, त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. पैशाची आवक चांगली होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : ७ मार्चपासून ‘या’ राशी मालामाल होण्याची शक्यता; शनिदेवाच्या राशीत शुक्रदेव गोचर करताच घरात नांदू शकते सुख-समृध्दी  )

मकर राशी

पौर्णिमा मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. शिक्षणाशी संबंधित लोकांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजनांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळण्यात यश मिळू शकेल. उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होऊ शकतात. प्रलंबित पैसे परत मिळू शकतात. कर्जातून सुटका होण्याची शक्यता आहे. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्यात यश मिळू शकतो. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे.

कर्क राशी

माघ पौर्णिमा कर्क राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. या काळात तुमचं जीवन चांगल्या वळणावर येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरु शकतो. या काळात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. नोकरी-व्यवसायात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. पैसा येण्याचे नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. व्यापारात फायदा आणि आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virgo full moon 2024 positive impact of these zodiac sing can get huge money pdb