– सोनल चितळे
Virgo Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi : कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध बुद्धीचा कारक ग्रह आहे. विचार शक्ती, आकलन शक्ती , परीक्षण आणि निरीक्षण क्षमता हे सर्व बुधाच्या अमलाखाली येते. त्याच प्रमाणे कन्या राशीच्या व्यक्ती बुद्धिमान, विचारी, चांगली आकलन शक्ती असलेल्या आणि उत्तम परीक्षण करणाऱ्या असतात. त्या हजरजबाबी असतात. संशोधक वृत्तीच्या ,चतुर, हास्यविनोदात पारंगत अशा कन्या राशीच्या व्यक्ती काही वेळा भोचक आणि खोचक देखील असतात. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. अशा या कन्या राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या अष्टम स्थानातील मेष राशीत स्थित असणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत राहू देखील हर्षलसह असेल. कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना नीट विचार करून पुढे जावे. तसेच मानसिक स्थैर्य जपणे आवशयक ठरेल. २१ एप्रिलपर्यंत गुरू सप्तमातील मीन राशीत असेल. तेव्हापर्यंत गुरुबल खूप चांगले असेल. या कालावधीत महत्वाची कामे पूर्ण करणे हिताचे ठरेल. विवाह योग जुळेल. २१ एप्रिलला गुरू अष्टमतील मेष राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर झाल्याने अनेक कामे रखडतील, रेंगाळतील. कामात अडीअडचणी येतील. १७ जानेवारीला शनी मकर राशीतून षष्ठ स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करेल. आर्थिकदृष्ट्या नियोजन करणे, काही धोरणे राबवणे यांसाठी हे भ्रमण हिताचे ठरेल. नोकरी व्यवसायात चिकाटीने , मेहनतीने आणि सातत्याने आपली स्थिती कायम राखून ठेवाल. जिद्द सोडू नका. थोडी सबुरी अंगी बाणवा. अशा या महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा एकत्रित विचार करता कन्या राशीचे वार्षिक राशी भविष्य असे आहे…
जानेवारी :
रवी, बुध आणि शुक्र यांचे भ्रमण आपल्याला साहाय्यकारी ठरेल. ऊर्जा, उत्साह वाढेल. बौद्धिक खाद्य मिळाल्याने आनंद होईल. गुरुबल चांगले आहे. हाती घेतलेली कामे झटपट पूर्ण होतील तसेच नव्या उपक्रमांना चालना मिळेल. १७ जानेवारीला शनी षष्ठ स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करेल. नोकरीतील कामे चिकाटीने पूर्ण कराल. शंका कुशंकांचे निरसन करून घेतलेत तर मोकळ्या मनाने कामे कराल. अतिचिकित्सा टाळावी. जोडीदारासह सूर जुळतील. मुलांना नव्या संधी उपलब्ध होतील. थंडीमुळे हाडांच्या, सांध्यांच्या समस्या बळावतील.
फेब्रुवारी :
विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. षष्ठ स्थानातील शनी, रवी, शुक्राच्या भ्रमणामुळे आर्थिक बाजू सावराल. कामातील रस वाढेल. व्यवसाय वृद्धीचे नियोजन सुरू कराल. गुरुची साथ असल्याने कष्टाचे चीज होईल. थोडी हिंमत दाखवा. भाग्यातील मंगळ पुष्टी देईल. चला पुढे ! जोडीदाराच्या उन्नतीमुळे वातावरण आनंदी असेल. मुलांच्या प्रश्नांना सहज उत्तरे सापडणार नाहीत. धीराने घ्यावे लागेल. नोकरदार वर्गाला वरीष्ठ व्यक्तींचा पाठींबा मिळेल. रक्तातील घटकांचे प्रमाण बिघडेल. योग्य ती काळजी घेणे आवश्यक !
मार्च :
शुक्राचे सप्तम आणि अष्टम स्थानातील भ्रमण आर्थिक दृष्ट्या संमिश्र फळ देईल. खर्चावर नियंत्रण ठेवलेत आणि पैसा योग्यप्रकारे गुंतवलात तरच लाभदायक ठरेल. अन्यथा कमावलेल्या पैशाला हजार वाटा फुटतील. नोकरी व्यवसायात आपले स्पष्ट मत खूप उपयोगी ठरेल. मोठ्या व्यक्तींना प्रभावित कराल. विद्यार्थी वर्गाने धीर सोडू नये. गुरुचे पाठबळ चांगले आहे. आत्मविश्वासाने पुढे जा. जोडीदाराच्या कामाचे कौतुक होईल. विवाहोत्सुक मंडळींना विवाह जमण्यास ग्रहबल चांगले आहे.
एप्रिल :
भाग्य स्थानातील शुक्र उच्च शिक्षणासाठी पूरक ठरेल. अडकलेली कामे पुढे सरकतील. कामकाजावर मंगळाचा प्रभाव पडेल. इतरांच्या मागे लागून कामं पूर्ण करून घ्याल. देणेकऱ्यांकडे तगादा लावाल. डोक्याचा ताप वाढेल. २१ एप्रिलला सप्तमातील गुरू अष्टमात, मेष राशीत प्रवेश करत आहे. तेव्हापासून आपले गुरुबल कमजोर होत आहे. ताण तणाव वाढेल. आर्थिक दृष्ट्या कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. विद्यार्थी वर्गाने डोळसपणे मेहनत घ्यावी. सर्दी, खोकला, ताप असे त्रास उदभवतील.
मे :
अष्टम स्थानात पाच ग्रह एकत्र आहेत. अडीअडचणींचा सामना करता करता दमून जाल. मार्ग न सुचल्याने हतबल व्हाल. अशा परिस्थितीत दशम स्थानातील शुक्र आशेचा किरण दाखवेल. महिन्याच्या मध्यानंतर रवीची मदत मिळाल्याने हळूहळू स्थिरस्थावर व्हाल. जोडीदाराला आपल्या आधाराने उभारी द्यावी लागेल. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवाल. विवाहोत्सुक मंडळींनी गुरुबल कमजोर असल्याने धीराने घ्यावे. नोकरी बदलू नका. आहे त्या परिस्थितीत संयमाने राहावे. उन्हाळी सर्दी आणि अपचनाचा त्रास भेडसावेल.
जून :
भाग्य स्थानातील वृषभ राशीतून बुध भ्रमण करत असेल. बुद्धिमत्ता आणि कलाकौशल्य यांचा मिलाप दिसून येईल. कामातील आखीवरेखीवपणा टिपण्यासारखा असेल. भाग्य आणि दशमातील रवीचे भ्रमण आपल्याला धीर देणारे असेल. जोडीदाराच्या कामकाजात अडीअडचणी येतील. विद्यार्थी वर्गाने या नव्या शैक्षणिक वर्षात अधिक सतर्क राहणे गरजेचे ठरेल. बुद्धिमत्तेला सरावाची जोड हवीच. गुरुबल कमजोर आहे. लाभ स्थानातील शुक्र मंगळाच्या जोरावर मेहनतीचे फळ मिळण्यास मदत होईल. स्नायू, स्नायूबंध आखडतील. ताठर होतील.
जुलै :
अष्टमातील राहू, हर्षलसह गुरुचे भ्रमण वैचारीक अस्थैर्य देईल. निश्चयापासून ढळू नका. कसोटीची वेळ आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. सभोवतालची प्रलोभने आपले मन विचलित करतील. सावध राहाल तरच वाचाल. अन्यथा लोभाच्या भोवऱ्यात फसाल. प्रेमवीरांनी सावधगिरी बाळगावी. रवी बुधाच्या आधाराने विवेकबुद्धी प्रयत्नपूर्वक जागरूक ठेवलीत तरच धोका टळेल. नोकरी व्यवसायात स्थैर्य राखता येईल. विद्यार्थी वर्गाने मेहनत आणि सातत्य यांना अधिक प्राधान्य द्यावे. पाठ, मणका आणि पोट यांचे आरोग्य जपावे.
हे ही वाचा<< Leo Yearly Horoscope 2023: सिंह रास श्रीमंत कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचं राशीभविष्य
ऑगस्ट :
व्ययस्थानातील रवी, मंगळ, बुध यांच्या भ्रमणामुळे आत्मविश्वासाची सकारात्मक सीमारेषा ओलांडाल. पोकळ डौल बिनकामाचा असतो हे लवकरच लक्षात येईल. नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी धोपट मार्ग स्वीकारावा. आडमार्गाने जाल तर अडखळून पडाल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. जोडीदाराच्या साथीने चर्चेअंतीच कुटुंबातील महत्वाचे निर्णय पक्के करावेत. ताप, खोकला, साथीजन्य आजार बळावतील.
हे ही वाचा<< २०२३ मध्ये कर्क राशीला धनलाभ कधी? प्रेम व आरोग्य कसे असणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य
सप्टेंबर :
आर्थिक गुंतवणूक करताना स्वतःसाठी मर्यादा रेषा निश्चित करावी लागेल. पळत्यापाठी जाताना हातात असलेलेही गमावण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात महिन्याच्या मध्यानंतर रवी आणि शुक्र यांचा आधार मिळेल. सैरभैर न होता धीराने घ्यावे. योजलेली सगळी कामे पूर्ण होणे कठीण आहे. तरी देखील सातत्य सोडू नका. मेहनत कमी पडू नये. जोडीदाराची साथ उपयोगी पडेल. विद्यार्थी वर्गाच्या परदेशी शिक्षणासंबंधीत कामात विलंब होईल. अनपेक्षित हवा बदल मानवणार नाही. पित्त, वात आणि अपचन वाढेल.
ऑक्टोबर :
द्वितीय स्थानातील मंगळ, रवी, केतू सारखे उष्ण ग्रह कौटुंबिक वातावरण तप्त करतील. प्रकरण जास्त ताणू नये. नातेसंबंधातील दरी कशी मिटवता येईल हे पाहावे. गुरुबल कमजोर असल्याने इतरांचा रोष ओढवून घेऊ नका. नोकरी व्यवसायात कामाचा अतिरिक्त बोजा वाढेल. संयम बाळगावा. विद्यार्थी वर्गाने हिमतीने पुढे जावे. मेहनतीला पर्याय नाही. बुद्धिमत्तेला सातत्याची जोड मिळणे आवश्यक आहे. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांचे व्यक्तिस्वातंत्र्य जपावे. मूत्रविकार, जळजळ, इन्फेक्शन यांची काळजी घ्यावी.
नोव्हेंबर :
स्वतःसाठी वेळ काढाल. आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय घेताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला लाभकारक ठरेल. आत्मविश्वास बळावणे जरुरीचे आहे. धरसोड करू नका. तृतीय स्थानातील रवी आणि मंगळाचा राशी प्रवेश हिंमत वाढवेल. जोडीदारासह मिळते जुळते घ्याल. कौटुंबिक परिस्थिती सुधारेल. विद्यार्थी वर्गाने थोड्याशा यशाने गाफिल राहू नये. खरी कसोटी अजून पुढे आहे. हवामानातील बदलाचा श्वसन संस्था आणि रक्तदाब यावर परिणाम होईल. काळजी करू नका पण आवशयक ती काळजी घ्या.
डिसेंबर :
२८ नोव्हेंबरला राहूने अष्टमातून सप्तम स्थानातील मीन राशीत प्रवेश केला असेल. नवे करार डोळसपणे करावेत. परिणामांचा विचारविनिमय आधीच कराल. विद्यार्थी वर्गाने जिद्दीने आगेकूच करावी. गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात नव्या संकल्पना संबंधित व्यक्तींपुढे मांडाल. जोडीदाराच्या उत्कर्षाने समाधान वाटेल. मंगळाची साथ चांगली मिळेल. ध्येय निश्चित कराल. त्वचेसंबंधित त्रास वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.
एकंदरीत २०२३ या वर्षात शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवावे. अनावश्यक ताण, ताप टाळावा. मित्र मैत्रीणींचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांच्या भेटीअंती देखील परिस्थितीतील प्रश्न तसेच राहतील. उपाय सापडणार नाहीत. एप्रिलपर्यंत गुरुबल चांगले असेल. त्यामुळे नोकरीतील बदल, विवाहोत्सुकांचे विवाह ठरणे, संतती प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळणे, विद्यार्थी वर्गाच्या कष्टाचे चीज होणे या महत्वपूर्ण घटना घडतील. २१ एप्रिलनंतर मात्र गुरुबल कमजोर होत आहे. व्यवहारात सतर्क राहणे गरजेचे आहे. इतर ग्रहांच्या साथीने कामकाजातील समतोल राखला जाईल. षष्ठातील शनी विशिष्ट मर्यादेपर्यंत आर्थिक पाठबळ नक्कीच देईल. चिंता नको. खचून न जाता परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे. असे केल्यास आर्थिकदृष्ट्या स्थैर्य लाभेल. सांधे, स्नायू, स्नायूबंध , मणका आणि पचन संस्थेची विशेष काळजी घ्यावी. निश्चयाचा महामेरू ठरलात तर २०२३ हे वर्ष आपणास उत्कर्षकारक जाईल.