Saptahik Rashifal 1 to 7 July 2024: साप्ताहिक करिअर आणि आर्थिक राशिफळनुसार जुलैच्या पहिला आठवडा म्हणजे १ जुलै ते ७ जुलै २०२४ पर्यंत काळ काही राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे,. या राशीच्या जातकांना ७ दिवसात नोकरीमध्ये पद्दोन्नती, नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. चला जाणून घेऊ या…
मेष – व्यवसायात जे अडथळे येत होते ते दूर होतील. पैशामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर होतील. आर्थिक लाभ होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
वृषभ – तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि नोकरी मिळेल. पैशाशी संबंधित कामात यश मिळेल. तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल.
मिथुन – दिलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. तुम्ही परदेशात नोकरीच्या शोधात असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये काही तणाव असू शकतो.
कर्क – नोकरीत पद्दोन्नती होऊ शकते. बँका आणि शेअर बाजारातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्यांवर पैसे खर्च होऊ शकतात.
सिंह – तुम्हाला तुमच्या नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. अचानक मोठ्या खर्चामुळे तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते.
कन्या – चैनीच्या वस्तूंच्या खरेदीत पैसा खर्च होईल. व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. कौटुंबिक जीवनाशी संबंधित बाबींवर पैसा खर्च होईल.
तूळ – नोकरी न मिळाल्याने त्रासलेल्या लोकांचे प्रश्न सुटतील. रोजगार मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जमीन किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणे टाळा.
हेही वाचा – आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
वृश्चिक – रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारातून आर्थिक लाभ होईल. मुलांच्या शैक्षणिक गरजांवर पैसे खर्च होतील.
धनु – संपत्तीसंबंधित कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. मालमत्ता खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होईल. औषधांशी संबंधित व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल. धार्मिक प्रवासात पैसा खर्च होईल.
मकर – नवीन घर बांधण्यात पैसा खर्च होऊ शकतो. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. विचार न करता गुंतवणूक करणे टाळा.
कुंभ – आयात-निर्यातीच्या कामात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होऊ शकतात, जर बजेटचे पालन केले तर आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मीन – नवीन वाहन खरेदीसाठी पैसे खर्च होतील. कमिशन व्यवसायाशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल. धार्मिक यात्रांवर पैसा खर्च होईल. जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.