Weekly Horoscope 16 July to 22 July 2023: जुलैचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा १६ जुलै ते २२ जुलै २०२३ पर्यंत असेल. हा आठवडा आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. कारण या आठवड्यात श्रावणातील द्वितीय सोमवार व्रत, तृतीय मंगळागौरी व्रत, सोमवती अमावस्या असे महत्त्वाचे व्रत-उत्सव साजरे केले जातील. यासह, या आठवड्याच्या सुरुवातीला सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. चला जाणून घेऊया, की हा आठवडा सर्व राशींसाठी कसा असणार आहे आणि या आठवड्यात सर्व राशींनी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे?

मेष साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. काहीजण कौटुंबिक समस्यांमध्ये अडकू शकतात. कुटुंबात मालमत्तेबाबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कुटुंबात अचानक काही घटना घडू शकतात. या आठवड्यात तुम्हाला अनेक प्रसंगात अपमानाला सामोरे जावे लागू शकते. या आठवड्यात तुमच्या बोलण्यावर संयम ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे, अन्यथा तुम्ही मोठ्या वादात अडकू शकता. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, अन्यथा अपघात होऊ शकतो.

In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ
Rahu Mangal Gochar 2025
Rahu Mangal Gochar 2025 : १०० वर्षानंतर राहु आणि मंगळ बदलणार चाल, ‘या’ तीन राशी होणार मालामाल, मिळणार पैसाच पैसा!
Rahu Nakshatra Parivartan 2025
Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
Budh Gochar 2025
Budh Gochar 2025: उद्या होणार २०२५मधील पहिले गोचर; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा

वृषभ साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर कुठेतरी सहलीला जाऊ शकता. यासोबतच कुटुंबातील वातावरण चांगले राहील. तुमचा सन्मान वाढेल आणि कुटुंबाच्या हितासाठी तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. अनेक दिवसांपासून सुरू असलेले कौटुंबिक वाद या आठवड्यात दूर होतील. कुटुंबात शुभ कार्य होतील, कुटुंबात परस्पर सुसंवाद होईल. आध्यात्माकडे मनाचा कल राहील.

हेही वाचा – प्रत्येक स्त्री-पुरुषाने ‘ही’ चार कामे केल्यानंतर त्वरित करावी अंघोळ! चाणक्य नितीमध्ये सांगितले कारण…

मिथुन साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे. तुम्ही ठरवलेले काम पूर्ण होईल. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. या आठवड्यात तुमचे मन शांत असेल. कुटुंबासोबत तुम्ही हवामानाचा आनंद घेण्यासाठी बाहेर लांबच्या सहलीला जाऊ शकता. कुटुंबासोबतचा तुमचा हा सहवास येणाऱ्या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पत्नी आणि मुलांशी सुरू असलेले मतभेद मिटतील. या आठवड्यात कुटुंबासमोर तुमचे मन व्यक्त करू शकाल, ज्यामध्ये तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल.

कर्क साप्ताहिक राशीभविष्य
कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्रासदायक असू शकतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ राहू शकता. कुटुंबात अचानक घडलेल्या कोणत्याही घटनेमुळे संपूर्ण कुटुंबातील वातावरण अस्वस्थ होईल. तसेच, काही परिस्थितींमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या मतांशी सहमत असतील असे दिसत नाही, ज्यामुळे कुटुंबात परस्पर मतभेदांची परिस्थिती उद्भवू शकते.

सिंह साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी खूप मेहनतीचा असेल. तुम्ही ज्या कामाचा विचार करत आहात, अथक प्रयत्न करूनही त्यात यश न मिळाल्यास तुमचे मन अस्वस्थ होईल. कुटुंबातील तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्याने तुमचे मन दुखावले जाऊ शकते. कुटुंबात परस्पर मतभेद निर्माण होतील. कौटुंबिक बाबींवरून तुमच्या पत्नीचे कुटुंबातील सदस्यांशी भांडण होऊ शकते. त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा. वादविवादापासून दूर राहा. या आठवड्यात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.

हेही वाचा – तुमची खोली अन् स्वयंपाकघरात वावरताना ‘या’ चुका टाळा अन्यथा देवी लक्ष्मी होईल नाराज! जाणून घ्या काय सांगते वास्तुशास्त्र

कन्या साप्ताहिक राशीभविष्य
कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. काही समस्यांमुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. तसेच हा आठवडा काही समस्यांनी भरलेला असेल. कौटुंबिक किंवा कोर्टाच्या बाजूच्या समस्या या आठवड्यात तुमच्यासमोर येऊ शकतात. जुना वाद निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे मन चिंताग्रस्त होईल. काही खास कामासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटू शकता, ज्यामुळे तुमच्यासाठी चांगले ठरू शकते. पत्नीचे कुटुंबाशी वाद होऊ शकतात. कोणत्याही कौटुंबिक प्रकरणात जास्त पुढाकार न घेतल्यास चांगले होईल.

तुळ साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. कुटुंबात नवीन व्यक्तीच्या आगमनाने तुम्ही आनंदी व्हाल. तसेच, तुम्ही तुमचे जुन्या गोष्टीत अडकलेले पैसे परत मिळवू शकता, ज्यामुळे तुम्हाला नफा मिळेल. कुटुंबातील सर्वजण तुमचा आदर करतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सामाजिकदृष्ट्या तुम्हाला विशेष स्थान मिळू शकते. तुमचे वागणे लोकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकते.

वृश्चिक साप्ताहिक राशीभविष्य
या आठवड्यात तुम्ही सामाजिक वादविवादामध्ये अडकू शकता. दुसऱ्याच्या कामासाठी तुम्हाला दोष दिला जाऊ शकतो. विरोधक तुमचे नुकसान करू शकतात. कुटुंबातील काही लोकांच्या प्रयत्नाने परस्पर मतभेद निर्माण करण्यात विरोधी घटक यशस्वी होतील. तुमच्या कुटुंबाचे महत्त्व समजून घेणे तुमच्यासाठी चांगले राहील. सर्वांशी आपले नाते गोड ठेवा आणि बोलण्यावर संयम ठेवा आणि वेळ काळ बघून वागा.

हेही वाचा – Sun Transit 2023: सूर्यदेव करणार कर्क राशीत प्रवेश, जाणून घ्या १२ राशींवर कसा होईल प्रभाव?

धनु साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी अडचणींनी भरलेला असेल. काही कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत कुटुंबात वाद-विवाद किंवा भांडणाच्या परिस्थितीमुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता. कुटुंबातील लोक तुमच्या विरोधात जाऊ शकतात.

मकर साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला फायदा जाणवेल. आध्यात्माकडे मनाचा कल राहील. तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव पाडू शकाल. कुटुंबात प्रियजनांचे सहकार्य लाभेल आणि कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. पत्नीबरोबरची नाराजी दूर होईल. कोर्टात तुम्हाला विजय मिळेल. खूप जुना चालू असलेला वाद संपेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

हेही वाचा – Chanakya Niti : या ठिकाणी मनसोक्त करा पैसा खर्च, कधीच रिकामी होणार नाही तुमची तिजोरी; वाचा, चाणक्य काय सांगतात

कुंभ साप्ताहिक राशीभविष्य
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. विचारपूर्वक केलेली कामे पूर्ण होतील आणि जुने रखडलेले पैसे मिळतील. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कुटुंबात नवीन पाहुणे येऊ शकतात. तुमचे मन प्रसन्न राहील आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्यासोबत असतील.

मीन साप्ताहिक राशीभविष्य
या आठवड्यात तुम्ही कोणत्याही वादात किंवा भांडणात अडकू शकता. विरोधक वर्ग तुम्हाला त्यांच्या कटाचा बळी बनवू शकतो. वादविवादापासून दूर राहा आणि बोलण्यावर संयम ठेवा. कोणाचीही दिशाभूल करू नका. कुटुंबात सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. पत्नीशी मतभेद होऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे कौटुंबिक संबंध सुधारतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)

Story img Loader