Weekly Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष २०२५ मध्ये पहिल्या आठवड्यात चंद्र मकर राशीमध्ये विराजमान राहणार आहे. चंद्रावर मंगळाची सप्तम दृष्टी दिसून येईल. त्या कारणाने अत्यंत शुभ मानला जाणारा धन योग निर्माण होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात चार राशींचे नशीब चमकू शकते. त्यांना पहिल्या आठवड्यात आनंदाच्या बातम्या मिळू शकतात ज्याविषयी त्यांनी कधी विचारही केला नसेल. या लोकांना समाजात मान सन्मान मिळेल. धन संपत्ती मिळू शकते. आज आपण त्या चार राशींविषयी जाणून घेणार आहोत. (Weekly Horoscope four zodiac will get money and shine their luck in first week of New year 2025)
धनु राशी (Dhanu Rashi)
धनु राशीच्या लोकांसाठी वर्ष २०२५ चा पहिला आठवडा चांगल्या सुचना घेऊन येईल. या लोकांना अडकलेले धन परत मिळू शकते. कर्जापासून सुटका मिळेल. कोर्टामध्ये सुरु असलेलं प्रकरणं सुटणार. व्यवसायात लाभ मिळू शकतो.
कन्या राशी (Kanya Rashi)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरू शकतो. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढणार. या राशीचे लोक सामाजिक कार्यात सहभाग घेऊ शकतात. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता.
वृषभ राशी (Vrishabh Rashi)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष भरभराटीचे राहीन. हे लोक प्लानिंगबरोबर काम करणार आणि पुढे जाईन यामध्ये त्यांना यश मिळू शकते. या लोकांच्या घरी लहान मुलांचे आगमन होईल. नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. नवीन घर वाहन खरेदी करू शकतात.
हेही वाचा : १० वर्षानंतर निर्माण होणार गजकेसरी आणि मालव्य राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
वृश्चिक राशी (Vrishchik Rashi)
आपल्या लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा खूप खास असणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. हे लोक नवीन प्लॉट खरेदी करण्याचा विचार करू शकतात. जोडीदाराबरोबर बाहेर फिरण्याचा प्लान करू शकता किंवा सोने खरेदी करू शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)