Weekly Numerology Lucky Mulank : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेवरून व्यक्तीच्या भविष्याविषयी आपण जाणून घेऊ शकतो. आता एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या आठवड्यात बुध, शुक्र, शनि आणि राहु ची युती निर्माण होऊन चतुर्थी योग निर्माण होत आहे. तसेच शनि देव मृगशिरा नक्षत्रात उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करत आहे. या आठवड्यात अक्षय्य तृतीया सुद्धा आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या आठवड्यात २८ एप्रिल ते ४ मे पर्यंत तीन मुलांकच्या लोकाना आनंदाची वार्ता मिळू शकते. त्यांना नोकरी, व्यवसाय आणि यश मिळू शकते. कुटुंबात मंगलकार्य व शुभ कार्य दिसून येईल. जाणून घेऊ या ते तीन मूलांक कोणते आहेत.
मूलांक ७ (जन्मतारीख – ७, १६, २५)
एप्रिलचा शेवटचा आठवडा मूलांक ७ असणाऱ्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. कार्यक्षेत्रामध्ये या लोकांच्या मेहनतीचे कौतुक केले जाईल. या लोकांचा आत्मविश्वास वाढणार. समाजात या लोकांचा मान सन्मान वाढेल. हे लोक अनेक धार्मिक यात्रांमध्ये सहभागी होऊ शकतात. अध्यात्माकडे या लोकांची आवड वाढेल. या लोकांसाठी कमाईची संधी वाढू शकते. कोणत्याही गुंतवणुकीतून या लोकांना चांगला रिटर्न मिळू शकतो.
मूलांक ५ (जन्मतारीख – ५, १४, २३)
मूलांक ५ असणाऱ्या लोकांच्या जीवनात तणाव दिसून येत आहे. त्यांना तणावातून मुक्तता मिळेल. भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा दिसून येईल, ज्यामुळे घरात शांतीचे वातावरण दिसून येईल. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल काही लोकांना नवीन ठिकाणी पॅकेजसह चांगले जॉब ऑफर लेटर मिळू शकते. या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल.
मूलांक ३ (जन्मतारीख – ३, १२, २१, ३०)
हा आठवडा मूलांक ३ च्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. या लोकांना नोकरी व्यवसायात यश मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होतील. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात, ज्यामुळे या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना याचा चांगला लाभ मिळू शकतो. माता लक्ष्मीची या लोकांवर विशेष कृपा दिसून येईल. घर कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. कौटुंबिक सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)