Weekly Tarot Horoscope 19- 25 June 2023: जोतिषशास्त्रानुसार जून २०२३मध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये काही राशींच्या लोकांसाठी चांगला ठरू शकतो असे मानले जाते. ‘या’ आठवड्यात १९ जून २०२३ ला वृषभ राशीतून बुधाचा अस्त होणार आहे आणि त्यानंतर बुध मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे. चला जाणून घेऊ या, साप्ताहिक टॅरो राशिफळानुसार, १९ ते २५ जून २०२३ पर्यंत सर्व १२ राशींच्या लोकांसाठी कसा असेल आठवडा?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साप्ताहिक टॅरो राशिफळ जून २०२३

मेष टॅरो साप्ताहिक राशिफळः
टॅरो कार्ड्सनुसार मेष राशींच्या लोकांसाठी हा आठवडा खूप महत्त्वपूर्ण असेल असे मानले जात आहे. असे म्हणतात की, या लोकांनी व्यावहारिक असावे आणि आपल्या ध्येयावर लक्ष द्यावे. तसेच भावनिक होणे टाळावे. या काळात त्यांच्या आयुष्यात रोमान्स आणि प्रेम राहील.

वृषभ टॅरो साप्ताहिक राशिफळ :
टॅरो कार्ड्सनुसार, वृषभ राशीच्या लोकांना ‘या’ आठवड्यात सावधगिरी बाळगावी लागेल, असे मानले जात आहे. असे म्हणतात की, ‘या’ काळात वृषभ राशीच्या लोकांनी गोष्टी गृहीत धरू नयेत आणि धोकादायक गोष्टी करू नयेत. करिअरमधील अडथळे दूर होऊ शकतात आणि प्रमोशन-इन्क्रीमेंट मिळू शकते असेही मानले जाते.

मिथुन टॅरो साप्ताहिक राशिफळ :
राशिभविष्य : टॅरो कार्ड्सनुसार मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा व्यवसायात नवीन यश देईल असे मानले जाते. असे म्हणतात की, या काळात मिथुन राशींच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील. जुन्या वाईट सवयींपासून त्यांना मुक्ती मिळेल आणि वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवतील असे मानले जाते.

हेही वाचा – Palmistry: तळहातावर ‘X’ अक्षर असणारे लोक आयुष्यात कमावू शकतात भरपूर पैसा?

कर्क टॅरो साप्ताहिक राशिभविष्य:
टॅरो कार्ड्सनुसार कर्क राशीच्या लोकांना कोणत्याही स्पर्धेत यश मिळू शकते असे मानले जाते. असे म्हणतात, हे लोक नवीन प्रॉपर्टी-कार खरेदी करू शकतात तसेच त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच इतरांसाठी त्यांनी उपलब्ध राहावे, असेही सांगितले आहे.

सिंह साप्ताहिक टॅरो राशिफळ :
टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात सिंह राशीचे लोक महत्त्वाकांक्षी असतील असे मानले जाते. असे म्हणतात की या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील आणि त्यांना खरेदीला जाता येईल. या लोकांचे फायदेशीर संबंध निर्माण होतील असे मानले जाते.

हेही वाचा – पुढील महिन्यात शुक्र करणार सिंह राशीत प्रवेश! ‘या’ राशींवर होऊ शकतो धनवर्षाव?

कन्या टॅरो साप्ताहिक राशिफळ :
टॅरो कार्ड्सनुसार, या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना सांभाळून राहणे आवश्यक आहे असे म्हणतात. या लोकांच्या आयुष्यात मतभेद असू शकतात असे मानले जाते.

तूळ टॅरो साप्ताहिक राशिफळ:
टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांच्या वर्तणुकीत बदल होऊ शकतो असे मानले जाते. असे म्हणतात की, वैवाहिक जीवनात मतभेद होऊ शकतात. गुरुवारी या लोकांच्या आयुष्यात नातेसंबंध, संधी आणि विरोध सर्व गोष्टी एकत्र येऊ शकतात असे मानले जाते.

वृश्चिक टॅरो साप्ताहिक राशिफळ :
टॅरो कार्ड्सनुसार वृश्चिक राशीच्या लोकांना उपजीविकेच्या क्षेत्रात फायदा होईल, असे मानले जात आहे. असे म्हणतात की या लोकांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी जुळवून घेतले तर त्यांचाच फायदा होईल. परंतु त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येऊ शकतात.

हेही वाचा – सात दिवसांनी बुध ग्रह करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ?

धनू टॅरो साप्ताहिक राशिफळ :
टॅरो कार्ड्सनुसार धनू राशीच्या लोकांना आपल्या कामाची आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. असे म्हणतात की, या लोकांच्या जीवनात कुटुंबीयांच्या सहकार्याने आनंद येईल आणि त्यांनी पैसे वाया घालवू नयेत. जोडीदाराच्या भावनांचा आदर करता येईल.

मकर टॅरो साप्ताहिक राशिफळ:
टॅरो कार्ड्सनुसार, मकर राशीच्या लोकांचा प्रभाव, करिश्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती त्यांच्या शिखरावर असेल असे मानले जाते. असे म्हणतात की या लोकांचे प्रेमसंबंध दृढ होतील आणि व्यवसायात लाभ होईल. तसेच नोकरी शोधणाऱ्यांची प्रगती होईल असेही मानले जाते.

कुंभ टॅरो साप्ताहिक राशिफळ:
टॅरो कार्ड्सनुसार, कुंभ राशीच्या लोकांना करिअरच्या लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील. असे म्हणतात की, या लोकांना नवीन संपर्क आणि फायदा होईल आणि हे लोक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतील!

हेही वाचा शुक्रदेवाला प्रिय आहेत ‘या’ राशी? ‘या’ राशींचे लोक कमावू शकतात भरपूर पैसा

मीन टॅरो साप्ताहिक राशिफळ :
टॅरो कार्ड्सनुसार, मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात सर्जनशील क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल असे म्हटले जाते. असे म्हणतात की हे लोक त्यांच्या प्रगतीवर समाधानी असतील आणि त्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. कुटुंबात मात्र आनंदाचे वातावरण राहील, असेही मानले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)