उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या विजयासोबत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. तसंच अनेक विक्रम रचले असून याआधी कोणीही करु शकलं नाही अशी कामगिरी केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे झाला. गोरखनाथ मठाचे माजी महंत अद्वैयनाथ यांच्या संपर्कात आल्यानंतर अजय सिंह बिश्त योगी आदित्यनाथ झाले. योगी आदित्यनाथ यांचा लहानपणापासूनच अध्यात्माकडे कल होता. राजकारण आणि अध्यात्म हे दोन भिन्न मुद्दे आहेत पण योगींनी या दोन्ही गोष्टींवर प्रभुत्व मिळवले. कुंडलीतील ग्रहांच्या चांगल्या योगाचा परिणाम असल्याचं ज्योतिषांचं मत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीनुसार, त्यांचा लग्न सिंह असून कर्मकारक असल्याने सूर्य, शनि आणि बुध यांच्या युतीसह उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची अशी स्थिती व्यक्तीला राजसत्तेचा आनंद देते.
Astrology: योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत राजयोग, केतूची महादशा ठरली प्रभावी! काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
उत्तर प्रदेशात भाजपा सलग दुसऱ्यांदा सत्ता राखण्यात यशस्वी ठरली असून योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. या विजयासोबत योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-03-2022 at 18:36 IST
TOPICSज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeयोगी आदित्यनाथYogi Adityanath
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What astrologer says about yogi adityanath raj yog rmt