हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. बहुतेक लोकांना या दोषाबद्दल माहिती असते. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याचा केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते, तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकटं येत असतात. इच्छा असूनही, माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही. चला जाणून घेऊया त्याची कारणे आणि उपाय…

या कारणांमुळे पितृ दोष लागतो

  • ज्योतिष शास्त्रानुसार जर राहू ग्रह कुंडलीत केंद्रस्थानी किंवा त्रिकोणामध्ये असेल आणि त्यांची राशी नकारात्मक असेल तर पितृदोष तयार होतो.
  • राहु जर कुंडलीत सूर्य आणि चंद्राशी संबंधित असेल तर अशा कुंडलीत पितृदोष तयार होतो.
  • राहु जर कुंडलीत शनि किंवा गुरूशी संबंधित असेल तर कुंडलीत पितृदोष तयार होतो.
  • राहू दुसऱ्या किंवा आठव्या घरात असला तरी अशा कुंडलीत पितृदोष तयार होतो.

मूळ पुरुषाचा अपमान: हिंदू मान्यतेनुसार प्रत्येकाचा स्वतःचा मूळ पुरूष असतो. तो कोणतेही शुभ किंवा अशुभ कार्य करून देतो. येथे सर्व संस्कार करवून घेणारे कुटुंब पुजारी आहेत. शास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील मूळ पुरूषाचा अपमान केला असेल तर असे केल्याने तुम्ही पितृदोष लागतो.

पितृदोषाची कारणं :

  • धार्मिक स्थळातील पिंपळ किंवा वडाच्या झाड तोडणं
  • पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने
  • पितरांना विसरणे किंवा त्यांचा अपमान करणे
  • सापाला मारणे

पितृदोष निवारणासाठी उपाय

  • दररोज कावळे आणि पक्षांना खाणं द्या
  • दिवंगत पूर्वजांचं तर्पणविधी करणे
  • पितृदोष निवारणासाठी पूजा करा