Mulank Numerology : राशिचक्रामध्ये राशींनुसार व्यक्तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी जाणून घेता येते तसेच अंकशास्त्रामध्ये अंकाना विशेष महत्त्व आहे. अंकाचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर असतो. मूलांक काढण्यासाठी व्यक्तीच्या जन्मतारखेतील अंकाची बेरीज करावी करावी लागते. उदा. ५, १४, २३ ताखरेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. अंकशास्त्रामध्ये असे एकूण १ ते ९ मूलांक असतात आज आपण या सर्व नऊ मूलांकविषयी जाणून घेणार आहोत.

मूलांक १ – अंक शास्त्रानुसार मूलांक १ हा सूर्याचा अंक मानला जातो. या मूलांकचे स्वामी सूर्यदेव असतात. या मूलांकचे लोक सरळ, दयाळू, राजा समान आणि विश्वसनीय असतात.

Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Budh Uday 2024 The luck of these zodiac signs will shine from December 12th Mercury will bring be happiness in this life
१२ डिसेंबरपासून या राशींचे नशीब चमकणार! बुद्धीचा दाता बुधचा होईल उदय, ‘या’ जीवनात होईल आनंदी आनंद
4 December zodiac signs daily horoscope
४ डिसेंबर पंचांग: आज वृषभला भागीदारीतून लाभ तर कुंभला जोडीदार देणारा मोलाचा सल्ला; वाचा बुधवारी तुमचं नशीब तुम्हाला कसं साथ देणार?
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य

मूलांक २ – अंकशास्त्रानुसार मूलांक २ चा स्वामी ग्रह चंद्र असतो. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. मूलांक २ असणाऱ्या लोकांना नेहमी बदल हवा असतो. ते नेहमी सक्रिय असतात आणि त्यांचे मन अतिशय पवित्र असते.

हेही वाचा : Margashirsha Guruvar 2024: मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार? जाणून घ्या तारखा, पूजा विधी अन् मुहूर्त

मूलांक ३ – अंकशास्त्रानुसार मूलांक ३ चा स्वामी ग्रह गुरू असतो. हे लोक आत्मकेंद्री, आध्यात्मिक, मनमिळावू आणि शिस्तप्रिय असतात.

मूलांक ४ – अंकशास्त्रानुसार मूलांक ४ हा राहुचा अंक मानला जातो. या मूलांकचे लोक रागीट स्वभावाचे असतात. ते त्यांच्या मनातील कोणतीही गोष्ट शेअर करत नाही. ते कोणत्याही कामात खूप घाई करतात. ते अत्यंत धाडसी स्वभावाचे असतात.

मूलांक ५ – अंकशास्त्रानुसार मूलांक ५ असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह बुध असतो. हे लोक बुध ग्रहाच्या प्रभावामुळे अतिशय हुशार आणि संवेदनशील असतात. यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असतो.

मूलांक ६ – अंकशास्त्रानुसार मूलांक ६ हा शुक्राचा अंक आहे. हे लोक अत्यंत रोमँटिक, मृदभाषी, डिप्लोमॅटीक आणि लोकांना आपले म्हणणे ऐकून घेण्यास भाग पाडतात.

हेही वाचा : Shukra Gochar 2024 : पुढील २६ दिवस या तीन राशींवर पडणार पैशांचा पाऊस! शुक्राच्या मकर राशीतील प्रवेशाने करिअर, व्यवसायात भरघोस नफा

मूलांक ७ – अंकशास्त्रानुसार मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा स्वामी ग्रह केतु असतो. त्यामुळे हे लोक अत्यंत रहस्यमयी, अध्यात्मिक स्वभावाचे असतात.

मूलांक ८ – अंकशास्त्रामध्ये ८ हा शनिचा अंक मानला जातो. हे लोक अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि संघर्षशील असतात.

मूलांक ९ – अंकशास्त्रामध्ये मूलांक ९ चा स्वामी ग्रह मंगळ असतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे या मूलांकचे लोक स्वाभिमानी, साहसी आणि पराक्रमी स्वभावाचे असतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)