Kojagiri Purnima 2022: हिंदू दिनदर्शिकेनुसार उद्या म्हणजेच ९ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. दरवर्षीं तिथीनुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतांच्या अनुसार या रात्री अवकाशातून अमृत वर्षाव होतो अशी श्रद्धा असते. या दिवशी अनेक घरांमध्ये माता लक्ष्मीचे व्रत केले जाते तसेच भगवान विष्णूंच्या पूजनाने जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात अशीही मान्यता प्रचलित आहे. यंदा कोजागिरीपासून चार नशीबवान राशींवर लक्ष्मीची कृपादृष्टी राहण्याचे योग आहेत. या राशी कोणत्या जाणून घेऊयात..
मेष राशि (Aries)
कोजागिरीपासून सुरु होणारा मोठा कालावधी तुमच्या हिताचा असू शकतो. धनप्राप्तीचे वेगवेगळे स्रोत यामुळे निर्माण व विकसित होऊ शकतात. इतकेच नव्हे तर अत्यंत सन्मानाने आपल्याला धनप्राप्तीचे संकेत आहेत. प्रवासाचे योग आहेत मात्र प्रवासातूनही आर्थिक मिळकतीच्या संधी आहेत. हा काळ आपल्यासाठी गुंतवणूक करण्याचा आहे त्यामुळे जरी तुमची कमाई वाढली तरी तिला अत्यंत काळजीपूर्वक गुंतवण्याचे विचार सुरु करा. वाहन खरेदी किंवा एखाद्या जागेत पैसे गुंतवणार असाल तर फायद्याची डील मिळू शकते.
कन्या राशि (Virgo)
कन्या राशीच्या व्यक्तींचा उत्साह या काळात आभाळाएवढा असेल. आर्थिक लाभ व कौटुंबिक सुखाची दुहेरी जोड लाभल्याने तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही असे दिसत आहेत. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असू शकतात त्यामुळे आर्थिक मिळकत वाढण्याची संधी आहे. व्यवसायिकांसाठी सुद्धा हा काळ वृद्धीचा ठरू शकतो. विशेष म्हणजे एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊन त्या माध्यमातून पैसे कमावण्याचा योग तुमच्या नशिबात आहे.
तूळ राशि (Libra)
तुम्हाला कोजागिरीच्या नंतर दिवाळीपर्यंत गुंतवणूक व त्यानंतर मिळकत असा योग आहे. त्यामुळे कामात थोडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही प्रलंबित गोष्टींवर काम करण्याचा विचार करू शकता. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते. ऑफिसच्या कामासाठी यात्रेचा योग आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये जोडीदाराची साथ लाभल्याने तुम्ही खुश राहू शकता.
कोणत्या राशीसाठी कोणती नोकरी ठरते लाभदायी? धन व सन्मान कमवायचा असेल तर काम निवडताना…
धनु राशि (Sagittarius)
गुंतवणूक करताना तुम्ही जवळच्या मित्राचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल पण आंधळा विश्वास टाकू नका. पार्टनरशिपमधूनच अधिक नफा कमावण्याची संधी आहे. पार्टनरसह तुमचे नातेसंबंध सुधारण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी प्रमोशन व पगारवाढ मिळण्याची संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हला कर्ज किंवा EMI एकाच झटक्यात परतफेड करता येऊ शकते.
(टीप: वरील लेख हा माहितीपर आहेत यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही हेतू नाही)