Diwali Lakshmi Pujan 2024 Shubh Muhurat : सध्या देशभरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख, समृद्धी आणते. या पाच दिवसांमध्ये लक्ष्मीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली आहे. पण यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी आहे आणि कोणत्या वेळी करावे, याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आहे. याविषयी लोकसत्ताने पंचागकर्ते पं. गौरव देशपांडे यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्ष्मीपूजन कधी करावे?

पंचागकर्ते पं. गौरव देशपांडे सांगता, “अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ (सूर्यास्तानंतरचा काळ) हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो. त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मीपूजन करावे.

धर्मशास्त्राच्या नियमानुसार, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, त्या ठिकाणच्या सूर्यास्तानंतर अमावस्या जर २४ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त उपस्थित असेल, तर त्या दिवशीच लक्ष्मी पूजन करावे. पण सूर्यास्तानंतर अमावस्या समाप्तीचा काळ जर २४ मिनिटांपेक्षा कमी असेल तर आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असं शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथील सूर्यास्तानंतर तिथून अमावस्या संपायची जी वेळ असते, तो वेळ मोजायचा.

हेही वाचा : Guru Vakri 2024 : १२ वर्षानंतर गुरूची शुक्र राशीमध्ये वक्री, ‘या’ तीन राशींना मिळणार अपार पैसा अन् धन

धर्मशास्त्रानुसार, “सूर्यास्तानंतर १ दंड म्हणजे १ घटिका अर्थात २४ मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त अमावस्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि जर सूर्यास्तानंतर २४ मिनिटांपेक्षा कमी अमावस्या असेल त्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे.”

काशी येथील पं पु. श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी, सांगदेव विद्यालय यांनी लक्ष्मीपुजनाबाबतीत एक लेखी निर्णय दिलेला आहे. “ज्या गावी अमावस्या सूर्यास्तानंतर किंवा त्यापेक्षा जास्त मिळत असेल, त्या गावी १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे आणि ज्या गावी अमावस्या २४ मिनिटांपेक्षा म्हणजे एक घटिकेपेक्षा कमी असेल अशा गावी ३१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे.”

कोणत्या शहरात ३१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे?

अहमदनगर, संभाजीनगर, अहिल्यानगर, वडोदरा, बंगळूरू, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक,सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर, धारवाड

कोणत्या शहरात १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे?

अकोला, अमरावती, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, ग्वाल्हेर, हैदराबाद, लातूर, नागपूर, नांदेड, निझामाबाद, परभणी, वर्धा, यवतमाळ

सर्वात महत्त्वाचे म्हणजे राहु काळ, शुभ काळ अशुभ काळ बघायचा नसतो. सूर्यास्तानंतर २ तास २४ मिनिटांमध्ये आपण कधीही लक्ष्मीपूजन करू शकतो.

हेही वाचा : ५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार

लक्ष्मीपूजन का करतात?

अश्विन वद्य अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याची परंपरा आहे. पण तु्म्हाला माहिती आहे का लक्ष्मीपूजन का केले जाते. या दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका आहे.
लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरात नेहमी रहावे, त्यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते.याच कारणामुळे व्यापारी लोकही यादिवशी त्यांच्या कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन करतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is lakshmi pujan diwali lakshmi pujan 2024 date time check shubh muhurat ndj