Nautapa 2025 Date : हिंदू धर्मात नवतपाला विशेष महत्त्व आहे. हे उन्हाळ्यातील नऊ दिवस असतात जेव्हा पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते. या कारणाने या नऊ दिवसात वर्षातून सर्वात जास्त उन्हाचा पारा वाढतो. असं म्हणतात जर नवतपामध्ये चांगली ऊन तापली तर पाऊस सुद्धा चांगला पडतो, ज्यामुळे लोकाना दिलासा मिळतो.

चंद्राच्या घरात सूर्याचा प्रवेश

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र देवाचे रोहिणी नक्षत्रावर वर्चस्व असते म्हणजे स्वामी ग्रह असतो. त्यामुळे या नक्षत्रामध्ये सूर्याचा प्रवेश झाल्याने चंद्राची शीतलता कमी होते, ज्यामुळे उन्हाचा पारा वाढतो. पृथ्वीपासून जवळ असल्याने सूर्याची किरणे पृथ्वीवर थेट पडतात. ज्यामुळे झाडे झुडपे वाळतात.

केव्हापासून सुरू होतोय नवतपा?

यंदा सूर्य देव २५ मे ला रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या गोचरबरोबर नवतापा २०२५ ची सुरुवात होईल. त्यानंतर आठ दिवसाने खूप चांगलेच वातावरण तापणार आहे. हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार, खऱ्या अर्थाने मे महिन्यात उष्णता एवढी वाढणार की सर्व रेकॉर्ड मोडतील. या दरम्यान लोकांचे घराबाहेर पडणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

पावसाळा सुरू होण्यास नवतपाची महत्त्वाची भूमिका

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य देव रोहिणी नक्षत्रामध्ये १५ दिवसापर्यंत विराजमान राहीन. त्यानंतर नावाप्रमाणे नवतपामध्ये नऊ दिवस भयंकर उष्णता दिसून येईल ज्याचा प्रभाव १५ दिवस टिकून राहीन.

या भयंकर तापमानात समुद्राच्या वर बाष्पीभवनाची प्रक्रिया आणखी वेगाने होते आणि पाण्याने भरलेले ढग बनतात ज्यामुळे पावसाळा सुरू होण्यास मदत होते.

४५ डिग्री पर्यंत पोहचणार तापमान

जेव्हा नवतपा चालतो, तेव्हा धूळाने भरलेला वारा सुटतो. तापमान ४५ डिग्रीपर्यंत पोहचते. आकाशातून आगीचे गोळे पडताहेत, एवढं तापमान तीव्र होतं. घराबाहेर पडताना लोक खूप सतर्क राहतात आणि काळजी घेतात. पण निसर्गाच्या नियमानुसार नवतपाचे असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जर तापमानात वाढ झाली नाही, तर ढग निर्माण होणार नाही आणि पाऊस पडणार नाही, जे पुढे निसर्गासाठी हानिकारक ठरू शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)