Durga Ashtami and Navami 2024 Date Time : वैदिक कॅलेंडरनुसार, शारदीय नवरात्रीचा उत्सव दरवर्षी आश्विन महिन्यातल्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून होतो आणि नवमी तिथीला समाप्त होतो. यंदा नवरात्री उत्सव गुरुवार, ३ ऑक्टोबरला सुरू झाला आणि आता तो ११ ऑक्टोबरला समाप्त होईल. तर दुर्गामातेच्या मूर्तीचे विसर्जन १२ ऑक्टोबरला होणार आहे. पण यावेळी नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीच्या तारखांवरून अनेकांच्या मनात बराच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला अष्टमी आणि नवमीच्या तिथीची अचूक तारीख काय आहे याविषयी सांगणार आहोत; जेणेकरून तु्म्ही नवरात्रोत्सवाची योग्य प्रकारे सांगता करू शकाल.

अष्टमी तिथी प्रारंभ तारीख (When is Ashtami in 2024?

पंचांगानुसार, या वर्षी शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३१ वाजता सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबरला रात्री १२.०७ वाजता समाप्त होईल. अष्टमी तिथी समाप्तीनंतर नवमी तिथी सुरू होईल.

Astrology People become rich at a young age who born on this date maa Lakshmi show grace
कमी वयात श्रीमंत होतात ‘या’ तारखेला जन्मलेले लोक, लक्ष्मीची राहते विशेष कृपा
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
shukra nakshatra gochar 2024
८ दिवसांनी शुक्र करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश! या राशींना मिळणार पैसा, सुख- वैभव
Numerology News IN Marathi : People get Wealth and Success after the age of 42
‘या’ जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या ४२ व्या वर्षानंतर मिळतो धनसंपत्ती, पैसा अन् यश
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी ब्रह्मचारिणीची कृपा; व्यवसायात नफा ते नवी ओळख; वाचा शुक्रवारचे तुमचे राशिभविष्य
18th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य
Kendra Tirkon Rajyog
Shukra Navratri 2024: सोन्यासारखे उजळेल करिअर, नवरात्रीत ‘या’ ४ राशींवर पैशांचा वर्षाव होणार!
5th October Rashi Bhavishya In Marathi
५ ऑक्टोबर पंचांग: स्वाती नक्षत्रात फुलेल तुमचा संसार, दुर्गेचा ‘या’ राशींवर राहील आशीर्वाद; वाचा शनिवारी तुमच्या नशिबात लिहिलंय काय?

Dasara 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईक प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर खास मराठीतून पाठवा शुभेच्छा; पाहा लिस्ट

नवमी तिथी प्रारंभ तारीख (When is Navami in 2024?)

नवमी तिथी ११ ऑक्टोबरला रात्री १२.०७ वाजता सुरू होईल आणि १२ ऑक्टोबरला सकाळी १०.५९ पर्यंत राहील.

अष्टमी, नवमीचा उपवास नेमका कोणत्या दिवशी करायचा?

पंचांगानुसार, ज्यांना अष्टमी व्रत करायचे आहे, ते गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी उपवास करतील आणि ज्यांना नवमी तिथीचे व्रत करायचे आहे ते शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी करतील.

अष्टमी आणि नवमी तिथी पूजा मुहूर्त

पंचांगानुसार, ११ ऑक्टोबर म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजेची वेळ सकाळी ६.२० ते सकाळी ९.१४ अशी आहे आणि ११ ऑक्टोबर रोजी म्हणजे नवमीचा अमृत मुहूर्त सकाळी ९.१४ ते १०.४१ पर्यंत आहे.

कन्या पूजा केव्हा करावी?

तारखांच्या गोंधळामुळे कन्यापूजा कधी करावी याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यांनी महाअष्टमीची पूजा केली, त्यांनी शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी कन्यापूजा करावी आणि ज्यांनी नवमी तिथीची पूजा केली असेल, त्यांनी शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.५९ वाजण्यापूर्वी कन्यापूजा करावी. कारण- त्यानंतर दशमी तिथी सुरू होईल.

महाअष्टमीचे महत्त्व (Significance of Maha Ashtami)

नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी म्हणतात. याला महानिषाची रात्र, असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेच्या सर्वांत शक्तिशाली रूपाची पूजा केली जाते. या दिवशी माता दुर्गेच्या पूजेबरोबरच कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जी व्यक्ती या दिवशी कन्येची पूजा करते, त्याच्या घरात सुख-समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते. महाअष्टमीला माता दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. माता महागौरी हे अन्नपूर्णेचे रूप मानले जाते. त्यामुळे या दिवशी कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे.

महानवमीचे महत्त्व (Significance of Maha Navami)

महानवमीला माता दुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते. सिद्धिदात्रीची पूजा केल्याने मनुष्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, असे मानले जाते. माता सिद्धिदात्रीची आराधना केल्याने मनुष्य रोग आणि भय यांपासून मुक्त होतो. महानवमीच्या दिवशी माता सिद्धिदात्री आपल्या भक्तांना उपवासाचे फळ देते. त्यामुळे महानवमीला सर्वांत मोठे महत्त्व आहे, असे मानले जाते.