When is Shree akkalkot Swami Samarth Prakat Din 2025 : अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानले जाते. त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्व आहे. दरदिवशी अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते. दरवर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी अक्कलकोटमध्ये मंगलमय आणि भक्तिमय वातावरण दिसून येते. पहाटेपासून श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा १६९ वा प्रकटदिन सोहळा कधी आहे, तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा कधी आहे?
यंदा ३१ मार्च २०२५ म्हणजेच सोमवारी रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे.
इ.स. १८५६ च्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अक्कलकोट नगरीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, दि. ०६/०४/१८५६ दिवस रविवार होता.
स्वामींनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केले. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार असल्याचे मानले जाते.
हिंदू पंचागात प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व आहे. गुरुवार हा दिवस स्वामी समर्थांना अर्पण केला आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दु:ख दूर होतात. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.’ हे त्यांचे लोकप्रिय शब्द भक्तांना नेहमी जगण्यास बळ देतात. भक्तांच्या मते, स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते तसेच नैराश्य दूर होते.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक होई रे मना।
निर्भय होई रे मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी
नित्य आहे रे मना।
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी॥१॥
जिथे स्वामीचरण तिथे न्युन काय।
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेविन काळ ना नेई त्याला।
परलोकीही ना भिती तयाला॥२॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
उगाची भितोसी भय हे पळु दे।
वसे अंतरी स्वामी शक्ती कळु दे।
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा।
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा॥३॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
खरा होई जागा श्रद्धेसहीत।
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ।
नको डगमगु स्वामी देतील हात॥४॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।
विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ।
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥ ५॥
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।