Tulsi Vivah 2022 Shubha Muhurat and Puja Vidhi: भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. आषाढी एकादशीनंतर भगवान विष्णू चार महिने निद्रस्थ होतात. म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी असे संबोधले जाते. या काळात कोणतीही शुभ कार्य, लग्न समारंभ शक्यतो केले जात नाहीत, अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला म्हणजेच देवउठनी एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभ कार्यांना, लग्न समारंभांना सुरूवात केली जाते. कार्तिकी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात. यंदा कार्तिकी एकादशी, तुळशीचे लग्न कधी असणार आहे तसेच त्याचे शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घेऊयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुळशीच्या विवाहाची तारीख व मुहूर्त

द्रिक पंचांगानुसार यंदा कार्तिक एकादशी ४ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी पासून तुलसी विवाह सुरू होतात. तुळशीचे लग्न ५ नोव्हेंबरपासून सुरु होतील. ८ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुलसी विवाह साजरे केले जातील. यंदा ८ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असणार आहे.

तुळशीच्या लग्नाची आख्यायिका

पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका मुलीचे लग्न असूरांचा राजा जालंधरशी झाले होते. दृष्ट जालंधरला नष्ट करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते. म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि तिची पतीव्रता मोडीत काढली. भगवान शंकरांनी असूरांचा राजा जालंधरचा पराभव केला. मात्र वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला शालिग्राम नावाचा दगड बनण्याचा शाप दिला. भगवान विष्णूने वृंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तुळशी विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले

तुळशीचं लग्न ठरू शकतं ‘या’ राशींची दिवाळी; लक्ष्मी कृपेने मिळू शकते धन व प्रगतीची गोड बातमी

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्ती वैकुंठाचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे. तुळशीचं लग्न लावणार्‍याला कन्यादानाचे पुण्य लाभते असेही मानले जाते.

तुळसी पूजन मंत्र-


तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

(वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is tulsi vivah shubh muhurta in diwali 2022 kartiki ekadashi puja vidhi tulsi rangoli designs svs