हिंदू धर्मात गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. असे मानले जाते की गायत्री मंत्र विधीप्रमाणे केला नाही तर त्याचे पूर्ण पुण्य मिळत नाही. गायत्री मंत्र जपण्याचे काही नियम सांगितले आहेत. मंत्राचा जप करताना या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, मंत्राचा उच्चार स्पष्टपणे केला जातो. जप करताना चुकीचा उच्चार केल्यास व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.
गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती, ऑफिसमध्ये येणाऱ्या अडचणी इत्यादी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. गायत्री मंत्राचे अनेक फायदे आहेत. मात्र यासंबंधी नियमांची काळजी घेतली नाही, तर त्याचे विपरीत परिणामही होऊ शकतात. चला जाणून घेऊया गायत्री मंत्राचा जप करण्याची योग्य पद्धत कोणती.
- पिवळे कपडे परिधान करून जप करणे
गायत्री मंत्राचा जप सूर्योदयाच्या काही वेळापूर्वी सुरू करावा, असे सांगितले जाते. त्याच वेळी, गायत्री मंत्राचा जप दुपारीही करता येतो. गायत्री मंत्राचा जप करताना पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत, असे करणे शुभ मानले जाते.
जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ
किमान १०८ वेळा मंत्राचा जप करावा
गायत्री मंत्राचा जप १०८ वेळा करावा. असे केल्याने चांगले परिणाम मिळतात. त्याचा मंत्र रुदक्षाच्या माळेने जपला जातो. रुद्राक्षाचे मणी शुभ मानले जातात. यासोबतच असे मानले जाते की हा जप केल्याने इच्छित फळ मिळते. गायत्री मंत्र नेहमी मौनात केला जातो.
- असे अन्न खाऊ नये
गायत्री मंत्राचा जप करण्यापूर्वी खाण्यापिण्याची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. मंत्र म्हणण्यापूर्वी अन्न शुद्ध असावे. या काळात जप करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार करू नये. तसेच दारूचे सेवन करू नये. असे करणे अशुभ मानले जाते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसून येतो.
- रोगांपासून मुक्ती मिळते
असे मानले जाते की गायत्री मंत्राचा जप केल्याने व्यक्तीला रोगांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धी नांदते. सकारात्मक ऊर्जा राहते. मंत्राचा जप केल्यानंतर पात्रात भरलेले पाणी सेवन करावे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)