धर्मग्रंथानुसार हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत सोळा संस्कारांचे वर्णन आहे. ज्यामध्ये सोळावा आणि अंतिम संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. ज्याला अंत्यसंस्कार असेही म्हणतात. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराच्या संदर्भात अनेक प्रथा पाळल्या जातात. सूर्यास्तानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत, अशीही एक प्रथा आहे. गरुड पुराणात याबद्दल काय सांगितलं आहे, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रात्री अंत्यसंस्कार का करत नाही? काय आहे कारण?
गरुड पुराणानुसार सूर्यास्तानंतर अंतिम संस्कार करू नयेत. सूर्यास्तानंतर स्वर्गाचे दरवाजे बंद होतात आणि नरकाचे दरवाजे उघडतात, अशी यामागची धारणा आहे. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी एखाद्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केल्यास त्या आत्म्याला नरकाचा त्रास सहन करावा लागतो आणि पुढील जन्मात अशा व्यक्तीच्या अंगात दोष असू शकतात, असे मानले जाते. म्हणूनच रात्री एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर तुम्ही पाहिले असेलच, मृतदेह सूर्योदयापर्यंत ठेवला जातो. तसंच त्यानंतरच अंतिम संस्कार केले जातात.

आणखी वाचा : ऑगस्टमध्ये अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन, या ४ राशींना मिळू शकतो अमाप पैसा आणि पद

अग्नी कोण देऊ शकतं?
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा अंत्यविधी मृत व्यक्तीचा मुलगा, भाऊ, पुतण्या, पती किंवा वडील करू शकतात. गरुड पुराणानुसार कोणत्याही स्त्रीला अग्नीचा अधिकार दिलेला नाही. कारण स्त्री ही परक्याची संपत्ती मानली जाते. तसच वंश वाढविण्याचा अधिकार फक्त पुत्रालाच आहे. त्यामुळे स्त्री अग्नी देऊ शकत नाही.

आणखी वाचा : बुध ग्रह सिंह राशीत बनवणार विपरीत राजयोग, या ३ राशींना संपत्तीसह प्रगतीची दाट शक्यता!

गरुड पुराणानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या व्यक्तीने ज्या ठिकाणी शरीर सोडले त्या ठिकाणी सर्वात आधी शेण टाकावे. त्यानंतर मृत व्यक्तीच्या शरीराला गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. या दरम्यान ओम अपोहिष्ठ मंत्राचा जप करा. त्यानंतर मृत व्यक्तीला नवीन कपडे घालावे. त्यानंतर मृत व्यक्तीच्या शरीराला फुल आणि चंदनाने सजवावे. असे मानले जाते की, जर मृत शरीरावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार केले गेले नाहीत तर त्याला मोक्ष मिळत नाही. म्हणून दशगात्र-विधान, षोडश-श्राद्ध, सपिंडीकरण इत्यादी क्रियाही केल्या पाहिजेत.