आपला हिंदू धर्म अनेक प्राचीन मान्यतांवर आधारित आहे. शास्त्रांमध्ये अनेक अशा गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे ज्यांचा संबंध आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित आहे. या मान्यता कित्येक काळापासून चालत आल्या आहेत. जसे की संध्याकाळी तुळशीला हात लावू नये, रात्रीची नखे कापू नयेत, इत्यादी. अशीच एक मान्यता म्हणजे रात्रीच्या किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये. आज आपण जाणून घेऊया यामागे कोणते कारण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रत्येक मान्यतेच्या मागे काही ना काही धार्मिक कारण सांगण्यात येते. जसे, आपण सर्वांनीच वडीलधाऱ्या व्यक्तींकडून हे नक्कीच ऐकले असेल की संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारू नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते. परंतु यामागील शास्त्रीय कारण म्हणजे, पूर्वीचे लोक लालटेन किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात कामे करत असत. यावेळी जर एखादी मौल्यवान वस्तू घरात कुठे पडली, तर ती शोधणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत घरात झाडू मारल्यास ती वस्तू झाडूच्या माध्यमातून घराबाहेर जाण्याची भीती होती. या कारणांमुळे, पूर्वीच्या लोकांनी ते नियम म्हणून स्वीकारले आणि दिवसानंतर झाडू मारण्यास मनाई केली.

Akshaya Tritiya 2022 : जाणून घ्या या वर्षी कोणत्या दिवशी आहे अक्षय तृतीया; लग्न कार्यासाठी आहे शुभ मुहूर्त

याशिवाय एक मान्यता अशीही आहे की लोक सकाळीच घर स्वच्छ करून सजवत असत. त्यामुळे दिवसभर घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते आणि सूर्यास्तानंतर जर घर झाडून घेतलं तर ही सकारात्मक ऊर्जा झाडूसोबत घरातून बाहेर पडते.

शास्त्रांबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये दिवसाच्या चार प्रहरांमध्ये घर झाडण्याची वेळ सांगितली आहे. वास्तुशास्त्रानुसार रात्री घर झाडून घेतल्याने घरात दरिद्रता येते. वास्तुशास्त्रात असंही वर्णन आहे की संध्याकाळी झाडू मारल्याने आणि घरात कचरा साचल्याने घराच्या प्रगतीत अडथळे येतात.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is it forbidden to sweep the house in the evening find out the scientific reason behind this pvp