शनि देवाला अत्यंत क्रूर देवता मानले जाते. ते व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतात आणि म्हणूनच त्यांना न्यायाची देवता देखील म्हटले जाते. शनिदेवाच्या कृपेने माणसाचे जीवन सुंदर बनते. म्हणूनच शनिदेवाचे भक्त कमी नाहीत. शनिवारसह अनेक विशेष प्रसंगी हे भक्त शनि मंदिरात गर्दी करतात. परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का की इतर देवांप्रमाणे शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये का ठेवला जात नाही. सामान्यतः घरांमध्ये लक्ष्मी, महादेव, गणपती यांच्याशिवाय इतर सर्व देवतांच्या मूर्ती किंवा फोटो असतात. यासोबतच त्यांची रोज घरी पूजा देखील केली जाते.
पौराणिक मान्यतांनुसार, शनिदेवाला शाप मिळाला होता की ते ज्या कोणाकडे पाहतील त्याचा नाश होईल. यामुळेच कोणत्याही घरात शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही. जेणेकरून लोक त्यांच्या नजरेपासून दूर राहतील. इतकेच नाही तर, शनिदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये. तर, शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे.
घरातील ‘या’ जागांवर असते राहूचे स्थान; दुर्लक्ष ठरेल नुकसानीचे कारण
शनिदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. गरीब, असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)