Why not To Serve Three Rotis In Plate: अतिथी देवो भवः अशी भारतीयांची भावना आहे. आपल्याला लहानपणापासून आग्रह करण्याची भारी सवय असते. विशेषतः जर घरी कोणी जेवायला आलं की, घ्या घ्या करून गरजेपेक्षा जास्त पानात वाढलं जातं. अनेकदा समोरच्याला तेवढी भूक असेलच असंही नाही. पण तरीही आपल्याला वाढण्याचा आणि आपण कसे बेस्ट होस्ट आहोत हे दाखवण्याचा मोह आवरत नाही. पण तुम्हाला माहित आहे का ताटात तुम्ही काय व किती वाढता यावरून अनेक गोष्टींवर प्रभाव पडत असतो. धार्मिक मान्यतांनुसार ताट वाढण्यात चुका करणे शक्यतो टाळावे. यातीलच अनेकदा होणाऱ्या चुका म्हणजे भात एकच चमचा वाढणे किंवा ताटात तीन पोळ्या वाढणे.
तुमचा भाव जरी यात चांगला असला तरी त्याचे पडसाद व अर्थ जाणून घेणे ही महत्त्वाचे आहे. शास्त्रात आपण ताटामध्ये ३ पोळ्या एकत्र का वाढू नयेत याविषयी माहिती देण्यात आली आहे. अंकशास्त्रानुसार ३ हा अंक अशुभ मानला जातो. ही विषम संख्या असल्याने असा समज रूढ झाला असावा. तुम्ही जेवण वाढताना सुद्धा शक्यता २ किंवा २ ने भागाकार होईल अशा संख्येतच पोळ्या वाढण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू शास्त्रात जेव्हा एखाद्या माणसाचे निधन होते तेव्हा त्याच्या नावे तेराव्याचे विधी केले जातात. यावेळी त्रयोदशीला तीन पोळ्या वाढण्याची पद्धत आहे असे म्हणतात.
हे ही वाचा<< ३० वर्षांनी आज शनिदेव घरी परतले; ‘या’ राशींना करणार श्रीमंत? साडेसातीमुळे बक्कळ धनलाभाची संधी
तीन पोळ्यांच्या संदर्भात आणखी एक समज म्हणजे तीन पोळ्या वाढल्यास त्या जेवणाऱ्या व जेवू घालणाऱ्यामध्ये वाद होऊ शकतो असे समजले जाते. तीन हा शत्रुत्वाचा अंक म्हणूनही ओळखला जातो आहारतज्ञांच्या माहितीनुसार तीन पोळ्या वाढल्यास पोटाची भूकही लगेच मिटू शकते, यानंतर तुम्ही भात खायची इच्छा कदाचितच होऊ शकते. शरीराला पुरेपूर पोषण मिळावे यासाठी दोन पोळ्या व वाटीभर भात उत्तम ठरतो.
हे ही वाचा<< १३ मार्चपर्यंत ‘या’ राशी होतील अपार श्रीमंत? ५६ दिवस ‘या’ रूपात मंगळ देऊ शकतो बक्कळ धनलाभ
केवळ पोळ्याच नव्हे तर भाताच्या बाबत सुद्धा हाच नियम मानला जातो. भात वाढताना आपण एकच चमचा भात कधीही वाढू नये असे म्हणतात. किंचित का होईना पण निदान दोन किंवा दोनने भागाकार होणाऱ्या संख्येत भात ताटात वाढला जावा असे अनेक वयस्करांकडून सांगितले जाते.
दरम्यान, जेवणाचे ताट वाढण्यासाठी आहारतज्ज्ञांनी व शास्त्रातही अनेक नियम आहेत, यातील सर्वात सोपा नियम म्हणजे जे पदार्थ अधिक खाल्ले जातात ते उजवीकडे व तोंडी लावण्याचे पदार्थ डावीकडे वाढले जावे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)