Kojagiri purnima, Chandra Grahan 2023 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ऑक्टोबर महिना खूप खास ठरला आहे. कारण या महिन्यात नवरात्री, कोजागिरी पोर्णिमा यांसारखे महत्वाचे सण आणि वर्षातील शेवटचे चंद्रग्रहणदेखील या महिन्यात लागणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण अनेक अर्थांनी विशेष आहे. कारण २०२३ मधील हे एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहहे. त्यामुळे उद्याच्या म्हणजे २८ आणि २९ ऑक्टोबरच्या रात्री लागणाऱ्या चंद्रग्रहणाचा प्रभाव भारतात पडणार असल्यामुळे त्याचा सुतक काळही वैध असणार आहे.
असा घडणार महायोग –
उद्याचे चंद्रग्रहण शरद पौर्णिमेच्या रात्री लागणार आहे. अनेक दशकांनंतर शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण लागणार असल्याने मोठायोगायोग निर्माण झाला आहे. तसेच उद्या चंद्र मेष राशीमध्ये असणार आहे, जिथे गुरु आधीपासूनच उपस्थित आहे. मेष राशीत चंद्र आणि गुरूची युती झाल्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. अशा प्रकारे उद्या २८ ऑक्टोबर २०२३ रोजी चंद्रग्रहण, शरद पौर्णिमा आणि गजकेसरी योगाचा महायोग तयार होत आहे. हा महायोग काही राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. तसेच या राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा देखील असणार आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहे ते जाणून घेऊ.
वृषभ रास
उद्याचे चंद्रग्रहण वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आणणारे ठरु शकते. व्यावसायिक जीवनातील समस्या संपून तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे वेगाने सुरू होऊन ती लगेच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच तुमची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते तर नोकरदारांचे प्रमोशन आणि पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
मिथुन रास
चंद्रग्रहणामुळे तुमच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते. या काळात तुमचा तणाव कमी होऊ शकतो. घरगुती खर्चात कपात होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात.
कन्या रास
चंद्रग्रहणाच्या दिवशी घडणारा महायोग कन्या राशीच्या लोकांच्या नशीबाला साथ देणारा ठरु शकतो. नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तर या काळात गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळू शकतो.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी २८ ऑक्टोबरपासून शुभ काळ सुरू होत आहे. या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. तर व्यवसायातही लाभ होऊ शकतो. तुमच्या घरात सुख-शांती नांदू शकते तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)