December 2023 Gochar : २०२३ मधील शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना खूप खास असणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. डिसेंबर महिन्यात सूर्य, शुक्र, गुरू, बुध आणि मंगळ आपल्या चालीत बदल करणार आहेत. या पाच ग्रहांच्या परिवर्तनामुळे काही राशींना फायदा होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत. ज्यांना या वर्षातील शेवटचा महिना शुभ ठरु शकतो ते जाणून घेऊया.
सूर्य गोचर – डिसेंबर महिन्यातील १६ तारखेला सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करतील आणि ते १ महिना याच राशीत राहतील. सूर्यदेवाते हे गोचर मीन, मेष आणि धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
बुध गोचर – २८ डिसेंबर रोजी बुध ग्रह राशी बदल करणार असून सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या काळात मेष, धनु आणि मिथुन राशीच्या लोकांना चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- २०२४ मध्ये ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? मालव्य राजयोग बनताच संपत्तीमध्ये भरमसाठ वाढ होण्याची शक्यता
शुक्र गोचर – २५ डिसेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी शुक्र आपली राशी बदलेल, ज्यामुळे सिंह, मकर आणि कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्यासह व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो.
गुरु गोचर – मिथुन, मेष, कर्क आणि वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरूचे डिसेंबर महिन्यातील गोचर फायदेशीर ठरू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यात गुरु मार्गी होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी गुरु ग्रह थेट मेष राशीत जाणार आहे, ज्याचा वरील राशींना फायदा होऊ शकता.
मंगळ गोचर – रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी मंगळ आपली राशी बदलेल. २७ डिसेंबर रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. यामुळे कर्क, मीन, तूळ आणि मेष राशीच्या लोकांना मंगळ गोचरचे शुभ परिणाम मिळू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)