Shani Uday 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता मानले जाते. शनिदेव प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात असं मानलं जातं. अशातच आता येणाऱ्या नवीन वर्षात शनिदेव ३ वेळा राशी परिवर्तन करणार आहेत. ज्यामध्ये ११ फेब्रुवारीला शनिदेव कुंभ राशीत अस्त होणार आहेत. तसेच, १८ मार्चला पुन्हा कुंभमध्येच उदित होणार आहेत. यानंतर २९ जून रोजी शनिदेव वक्री होणार आहेत. शनिदेवाच्या या परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. पण ३ राशी अशा आहेत ज्यांचे नशीब २०२४ मध्ये उजळू शकते. या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहे ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus Zodiac)

शनिदेवाचे ३ वेळा राशी परिवर्तन करणे वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात यश मिळू शकते. १८ मार्चला शनिदेव उदित होताच तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळू शकते. तर नोकरदारांचे प्रमोशन होऊ शकते. व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तुम्हाला कामानिमित्त देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.

सिंह रास (Leo Zodiac)

शनिदेवाचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्ही नवीन कामाला सुरूवात करू शकता. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होऊ शकते. शनिदेवाने तुमच्या गोचर कुंडलीत शश राजयोग तयार केल्यामुळे या काळात भागीदारीच्या कामात प्रगती होऊ शकते. शनिदेव तुमच्या राशीच्या सहाव्या स्थानाचे स्वामी आहेत. त्यामुळे कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते.

हेही वाचा- १ जानेवारीपासून ‘या’ राशींचे अच्छे दिन? नशिबाची उत्तम साथ मिळणार, आर्थिक भरभराट होण्याची शक्यता

कुंभ रास (Kumbh Zodiac)

कुंभ राशीसाठी शनिदेवाचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला संपत्ती मिळू शकते. तसेच शनिदेव तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ देतील. या काळात तुम्ही महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढवू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती करु शकता. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. मार्चनंतर नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते.

(टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader