Tulsi Vivah 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशीचे लग्न केले जाते. यंदा २४ नोव्हेंबर रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. यादिवशी लक्ष्मीचे रूप असलेल्या तुळशीचे आणि विष्णूचे रूप असलेल्या शाळीग्रामची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी तुळशी आणि शाळीग्रामचा लग्न केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते. तुळशीच्या लग्नाच्या मुहूर्तावर अनेक शुभ योगांसह गजकेसरी योगही तयार होत आहे. या योगामुळे काही राशींना लाभ होणार आहे.
हिंदू पंजागानुसार, चंद्र २४ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे, जिथे तो २६ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. देवांचा गुरू बृहस्पति आधीच मेष राशीत आहे. अशा स्थितीत चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे शक्तिशाली गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच २४ नोव्हेंबरला तुळशी लग्नासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे. या योगांच्या निर्मितीमुळे काही राशींना संपत्ती आणि ऐश्वर्याचा भरपूर लाभ मिळू शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष रास
मेष राशीत गुरु आणि चंद्र यांची युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. २०२४ पर्यंत, या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा असेल, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. समाजात मान-सन्मान मिळू शकतो. विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊन तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्क रास
गजकेसरी योग कर्क राशींच्या लोकांना खूप आनंद देणारा ठरु शकतो. या राशीत गुरु दहाव्या स्थानी विराजमान आहे. या राशीच्या लोकांवरही देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहू शकते. तुमच्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. वाहन, मालमत्ता खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. वडिलधाऱ्यांच्या मदतीने व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – Tulsi Vivah 2023: केव्हा आहे तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
कुंभ रास
या राशीच्या तिसऱ्या स्थानी गजकेसरी योग तयार होणार आहे. या योगाचा कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. तसेच या काळात तुम्ही करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकता. तुमची अध्यात्माकडे आवड वाढू शकते. तुम्हाला २०२४ मध्ये मोठा फायदा होऊ शकतो. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धनात वाढ होऊ शकते. कर्जमुक्तीमुळे संपत्तीत वाढ होऊ शकते. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्येही यश मिळू शकते. कुटुंबातील सुख-सुविधांमध्येही वाढ होऊ शकते. तसेच तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)