नवीन वर्ष २०२२ ला सुरुवात झाली असून लोकांना नवीन वर्षाकडून खूप अपेक्षा आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीच्या आयुष्यात एक शुभ काळ येतो, जेव्हा ग्रह संक्रमणाचा चांगला योग तयार होतो. त्याच ग्रहांची स्थिती देखील चालू असते, तेव्हा चांगल्या संधी मिळतात. मान्यतेनुसार शुभ योगामुळे व्यक्तीचे भाग्य बदलते आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. काही विशेष शुभ योग २०२२ मध्ये तयार होणार आहेत. या शुभ योगांमुळे व्यक्तीचे नशीब उजळू शकते. तसेच व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकते. २०२२ मध्ये कोणते शुभ योग तयार होणार आहेत ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधादित्य योग: २०२२ या वर्षाच्या मध्यात सूर्य आणि बुध यांच्या संयोगातून बुधादित्य योग तयार होईल. हा योग ८ एप्रिल २०२२ ते २५ एप्रिल २०२२ पर्यंत असेल. हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो. या योगामुळे बुध आणि रवि प्रभावित लोकांना विशेष लाभ होईल. ज्योतिष शास्त्रानुसार या योगामुळे व्यक्तीला मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळते. तसेच, जे राजकारणाशी संबंधित आहेत, त्यांचे नशीब या काळात चमकू शकते. त्यांना नवीन पद मिळू शकते. मात्र व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य आणि बुध कोणत्या राशीमध्ये आहेत आणि त्यांची स्थिती कशी आहे, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शश योग: एप्रिल २०२२ ते १२ जुलै २०२२ पर्यंत शश योग तयार होईल. जेव्हा शनि स्वतःच्या राशीत असतो (मकर, कुंभ) किंवा जेव्हा शनि त्याच्या उच्च राशी तूळेत असतो आणि कुंडलीच्या केंद्रस्थानी असतो तेव्हा हा योग जन्मकुंडलीत तयार होतो. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक आहे. या काळात सर्व राशींवर शनिदेवाची कृपा राहील. विशेषत: जे सरकारी अधिकारी, वकील, न्यायाधीश आहेत त्यांना विशेष फायदा होईल. तसेच जे लोक जमीन-इमारतीशी संबंधित व्यवसाय करत आहेत, त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Astrology: जानेवारी २०२२ मध्ये मकर राशीत दोन शत्रू ग्रह एकत्र; या पाच राशींना मिळणार शुभ फळ

रूचक योग: २६ फेब्रुवारी २०२२ ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत रुचक योग तयार होईल. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ स्वतःच्या राशीत उच्च असेल तेव्हा हा योग तयार होतो. मंगळाचा प्रभाव असलेल्या लोकांसाठी या योगाचा प्रभाव अधिक फायदेशीर ठरेल. तसेच जे सैन्य, पोलीस, डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्राशी निगडीत आहेत, त्यांना या योगाचा विशेष फायदा होणार आहे.

गुरु-मंगळ योग: वैदिक ज्योतिषशास्त्रात हा अतिशय शुभ आणि फलदायी योग मानला जातो. मंगळ आणि गुरूच्या मिलनाने हा योग तयार होतो. हा योग मे २०२२ मध्ये मीन राशीत तयार होणार आहे. मीन राशीच्या लोकांना हा योग तयार झाल्यामुळे विशेष लाभ होईल. तसेच ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ आणि गुरूची स्थिती चांगली आहे, त्यांना लाभ होऊ शकतो. हा योग तयार झाल्याने जीवनात समृद्धी, करिअरमध्ये प्रगती तसेच वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.